adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

छावा ग्रुप पोलीस मित्र संघात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नियुक्तीपत्र प्रदान समारंभ उत्साहात

 छावा ग्रुप पोलीस मित्र संघात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नियुक्तीपत्र प्रदान समारंभ उत्साहात   अशोक कोळी चोपडा  (संपादक -:- हेमकांत गा...

 छावा ग्रुप पोलीस मित्र संघात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नियुक्तीपत्र प्रदान समारंभ उत्साहात 


 अशोक कोळी चोपडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : छावा ग्रुप पोलीस मित्र संघ, चोपडा तालुका, जिल्हा जळगाव यांच्या वतीने श्री. महेश (आण्णा) फडतरे, संस्थापक अध्यक्ष, छावा ग्रुप पोलीस मित्र संघ यांच्या आदेशानुसार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार व नियुक्तीपत्र प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमास जळगाव जिल्हा अध्यक्ष धनराज उमरे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हितेश मराठे, चोपडा तालुका अध्यक्ष पत्रकार ललित कोळी आणि चोपडा तालुका उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी धनराज उमरे, हितेश मराठे, निलेश वाणी, गणेश भाई, ज्ञानेश्वर वाढे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी, सदस्य तसेच छावा ग्रुप पोलीस मित्र संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला अधिक बळ देणे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणे तसेच पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते दृढ करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमात संघटनेच्या आगामी सामाजिक उपक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments