adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शैक्षणिक साहित्य वाटप,जयहिंद क्रिकेट क्लब यांचा पुढाकार

 शैक्षणिक साहित्य वाटप,जयहिंद क्रिकेट क्लब यांचा पुढाकार  चोपडा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जयहिंद क्रिकेट क्लब,चोपडा (चोपडा नवच...

 शैक्षणिक साहित्य वाटप,जयहिंद क्रिकेट क्लब यांचा पुढाकार 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जयहिंद क्रिकेट क्लब,चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) चोपडा प्रीमियर लीग (CPL-3) "Play for a Cause — खेळासाठी... समाजासाठी..." निधी वितरण व शैक्षणिक साहित्य वाटप दरवर्षी करत असतो  CPL-3 या स्पर्धेतून संकलित निधीचा वापर सामाजिक कार्यासाठी करण्यात येत असतो.गरजू रुग्णांसाठी मदत म्हणून हरताळकर हॉस्पिटल (चोपडा) येथील डायलिसिस सेंटरमधील गरीब रुग्णांच्या मोफत उपचारासाठी ₹1.50 लाखांचा निधी यशस्वीरीत्या सुपूर्द करण्यात आला आहे.

तसेच शैक्षणिक साहित्य वाटप उर्वरित निधीतून चोपडा तालुक्यातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर विशेष आभार या सामाजिक उपक्रमासाठी “एक वीट माझी” सामाजिक संस्थेने गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपासाठी मोलाची आर्थिक मदत गौरव महाले सर यांनी करून दिली. त्यांच्या या समाजाभिमुख योगदानाबद्दल जयहिंद क्रिकेट क्लब व सर्व लाभार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले, तसेच प्रमुख अतिथी एक वीट माझी या संस्थेचे संचालक गौरव महाले,साईबाबा हॉस्पिटलच्या संचालक सचिन काटे,न्यू बापू टी हाऊस चे संचालक राहुल महाजन त्याचबरोबर जय हिंद क्रिकेट क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर साखरे उपाध्यक्ष मनोहर पाटील सचिव रुपेश पाटील व जय हिंद क्रिकेट क्लबचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर देशमुख प्रास्ताविक रुपेश पाटील आभार गोपाल शिंपी यांनी केले..

No comments