adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला सुरुवात

 चोपडा शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला सुरुवात   अशोक कोळी चोपडा  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णाल...

 चोपडा शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला सुरुवात 


 अशोक कोळी चोपडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पिटल) ते बसस्थानक आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या सिंगल लेअर सेमी ट्रिमिक्स काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या स्थानिक विकास निधीतून या कामासाठी १ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

चोपडा शहरातील मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांनी अनेक वर्षांपासून केलेली रस्त्याच्या दुरुस्ती व काँक्रीटीकरणाची मागणी आता प्रत्यक्षात मार्गी लागत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, सुरू असलेल्या रस्ते विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान कामाच्या गतीबाबत काही त्रुटी निदर्शनास आल्या. नागरिकांना दर्जेदार रस्ते व मूलभूत सुविधा वेळेत मिळणे आवश्यक असल्याने कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना संबंधितांना देण्यात आल्या.

पाहणीच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करून संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांनी परस्पर समन्वय साधत रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

चोपडेकरांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रत्येक विकासकामावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेशी आणि गतीशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

शहरातील विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments