श्रीरामपूर शहर पोलिसांची धडक कारवाई; वाहतूक शिस्तीसह रात्रीचे कॉम्बिंग ऑपरेशन, नागरिकांकडून कौतुक श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमक...
श्रीरामपूर शहर पोलिसांची धडक कारवाई; वाहतूक शिस्तीसह रात्रीचे कॉम्बिंग ऑपरेशन, नागरिकांकडून कौतुक
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. दररोज मेन रोड व शिवाजी रोड परिसरात वाहतूक पोलिसांकडून दोन ते तीन वेळा विशेष कॉम्बिंग मोहीम राबविण्यात येत असून, नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. याशिवाय शहर पोलीस ठाण्यात नियमितपणे हजेरीची प्रक्रिया राबविण्यात येत असून, रात्री १० वाजल्यानंतर विशेष कॉम्बिंग ऑपरेशन करून संशयित व्यक्ती, गुन्हेगार व कायदा मोडणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होत असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
श्रीरामपूर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
नुकताच भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास सदिच्छा भेट देऊन पोलीस प्रशासनाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शहरातील वाहतूक नियंत्रण, कॉम्बिंग ऑपरेशन आणि गुन्हे प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे कौतुक केले. यावेळी हनीफ भाई पठाण यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी तथा सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल आभार व्यक्त केले. भविष्यातही अशाच प्रभावी पद्धतीने जनतेच्या सुरक्षेसाठी काम सुरू ठेवावे, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
--------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments