adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्थानिक गुन्हे शाखेचे मध्यरात्री भयानक ‘कॉम्बिंग ऑपरेशन..हद्दपार सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह घेतलं ताब्यात;मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश!

  स्थानिक गुन्हे शाखेचे मध्यरात्री भयानक ‘कॉम्बिंग ऑपरेशन..हद्दपार सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह घेतलं ताब्यात;मोठ्या नेटवर्कचा पर्दाफा...

 स्थानिक गुन्हे शाखेचे मध्यरात्री भयानक ‘कॉम्बिंग ऑपरेशन..हद्दपार सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह घेतलं ताब्यात;मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 ​अहिल्यानगर :-  जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार १२ ऑगस्टच्या मध्यरात्री संपूर्ण जिल्ह्यात 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवण्यात आले.या कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जामखेड हद्दीत मोठी कारवाई करत एका हद्दपार सराईत गुन्हेगाराला थेट गावठी कट्टा (पिस्तूल),मॅगझिन आणि जिवंत काडतुसासह मुसक्या आवळल्या आहेत.​स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार रोहित मिसाळ, मनोज साखरे,प्रताप देवकाते, अमोल कोतकर व जालींदर साखरे यांचे पथक जामखेड परिसरात गस्त घालत होते. याच दरम्यान गुप्त बातमीदाराकडून धक्कादायक माहिती मिळाली की,१ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार सागर बाळू लोखंडे (वय २६,रा. आरोळेवस्ती,जामखेड) हा बंदी असतानाही जामखेड-श्रीगोंदा रोडवरील 'हॉटेल गंगाई'जवळ थांबला आहे.​माहिती मिळताच पथकाने क्षणाचाही विलंब न लावता हॉटेल गंगाई परिसरात छापा टाकला आणि संशयिताला घेराव घालून ताब्यात घेतले.​आरोपी सागर लोखंडे याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता पोलिसांनाही धक्का बसला. त्याच्याकडे ५१,००० रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल, एक मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.

​पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने हे प्राणघातक हत्यार गणेश दादासाहेब भवर (रा. कळसपिंप्री,ता.पाथर्डी) याच्याकडून विकण्यासाठी आणल्याची कबुली दिली. गणेश भवर हा सध्या फरार असून पोलीस त्याचा तीव्र शोध घेत आहेत.​आरोपी सागर लोखंडे याच्यावर यापूर्वीच हद्दपारीची कारवाई झालेली असतानाही त्याने नियमांचे उल्लंघन करून जिल्ह्यात प्रवेश केला आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगले.याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५५३/२०२६ आर्म ॲक्ट ३/२५, ७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments