adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सायबर गुन्हेगारीत फसवणूक होत असेल तर डायल करा १९३०- ए पी आय अजयकुमार वाढवे..

 सायबर गुन्हेगारीत फसवणूक होत असेल तर डायल करा  १९३०- ए पी आय अजयकुमार वाढवे.  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा...

 सायबर गुन्हेगारीत फसवणूक होत असेल तर डायल करा  १९३०- ए पी आय अजयकुमार वाढवे. 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सायबर गुन्हेगारी आणि सायबर सुरक्षा या विषयावर यावल पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार, उपप्राचार्य डॉ हेमंत भंगाळे व डॉ आर डी पवार, प्रा भागवत पाटील उपस्थित होते. ए पी आय अजयकुमार वाढवे यांनी विद्यार्थ्यांना पासवर्ड कसा असावा, टु स्टेप व्हेरीफिकेशन म्हणजे काय, एम कवच २.०  ऍपचा उपयोग कसा करावा व सायबर गुन्हेगारीत फसवणूक होत असल्यास सायबर सुरक्षा हेल्पलाईन १९३० हा नंबर डायल करुन स्वतःला आणि इतरांनाही  सायबर गुन्हे घडण्यापासून कसे रोखावे असे सांगून सायबर गुन्हेगारीचे प्रकार, सायबर गुन्हे घडण्याचे माध्यम या विषयावर सविस्तर चर्चा करुन सायबर सुरक्षा विषयीची सविस्तर माहिती दिली,...

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ एस आर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वापर करताना सावधानता बाळगण्याच्या सुचना दिल्या. प्रास्ताविक व सुत्रसंचलन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा रत्नाकर कोळी यांनी केले तर आभार प्रा पंकज बोदडे यांनी मानले. या प्रसंगी यावल पोलिस स्टेशनचे पुरुषोत्तम पाटील, सागर कोळी तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते..

No comments