चोपडा वन विभागात एस आर पी टिम कार्यान्वित. विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चौगाव प्रतिनिधी यावल वन विभागातील चोपडा वनक्षेत...
चोपडा वन विभागात एस आर पी टिम कार्यान्वित.
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चौगाव प्रतिनिधी यावल वन विभागातील चोपडा वनक्षेत्रात लासुर,सत्रासेनव उमर्टी नियतक्षेत्रात अवैध प्रकार रोखण्यासाठी काल दि.२१/८/२०२६ रोजी एस आर पीं च्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे.चोपडा वनक्षेत्रात नव्याने रुजू झालेले वनक्षेत्रपाल बी डी कुंवर यांनी यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक सौरीष सहाय व सहाय्यक उपवनसंरक्षक एम बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.आतापर्यंत त्यांनी प्रत्येक कंपार्टमेंट पर्यंत पोहचत संपूर्ण चोपडा वनक्षेत्र पिंजून काढले आहे.आणि आता वनक्षेत्र संरक्षणाचाच एक भाग म्हणून वनपाल, वनरक्षक व वन मजूरांसोबत एस आर पी टिमला जंगलात पाचारण केले आहे.वन विभागात कुठल्याही प्रकारचे अवैध प्रकार घडू नयेत यासाठी त्यांनी ठोस पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.

No comments