फैजपूर व खिरोदा येथे वर्षावासाचे उद्घाटन. इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर व खिरोदा येथे दि.२९/०७/२०२६ रोजी भारतीय ...
फैजपूर व खिरोदा येथे वर्षावासाचे उद्घाटन.
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर व खिरोदा येथे दि.२९/०७/२०२६ रोजी भारतीय बौद्ध महासभेत तर्फेआषाढी पौर्णिमेला उद्घाटन करण्यात आले.सर्वात प्रथम तथागत भगवान बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉ..बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आयुष्माननीय निर्मलाताई अवसरमल,मायाताई सुरेश तायडे,जिल्हा संघटक वसुंधरा ताई मेढे,तत्कालीन मुख्याध्यापक आर.एल. आगळे, समाज सेवक अशोक भालेराव,शैलेंद्र अवसरमल यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी बौद्धाचार्य,केंद्रीय शिक्षक बी. डी. महाले यांनी सामुदायिक वंदना घेतली. तसेच वर्षावासाचे व उपसाचे महत्त्व सांगण्यात आले,बुद्धाचे तत्त्वज्ञान प्रज्ञा शील करुणा यावर आधारित आहे.धम्म हा मानवतावादी विज्ञानवादी मैत्रीवर सत्यावर आधारित आहे.त्याचबरोबर विष्णू मेश्राम यांनी पौर्णिमेचे महत्त्व सांगितले पौर्णिमेचे महत्त्व सांगितले.वर्षावासासाठी आगळेसर, अशोक भालेराव यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रवचन मालिकेसाठी बबन तायडे,निळकंठ भालेराव, देविदास साळुंखे,गिरधर इंगळे,लताबाई मेढे, कोकिळा बाई मेढे, मनुरेताई, खंडाळे ताई यांचे सहकार्य लाभले. आभार प्रतिभा ताई अवसरमल यांनी मानले.


No comments