मार्गदर्शक व गुरुवर्य अशोक राजपूत सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार समारंभ संपन्न छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल ...
मार्गदर्शक व गुरुवर्य अशोक राजपूत सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार समारंभ संपन्न
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल ३४ वर्षांची प्रदीर्घ, निष्कलंक व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) तथा राष्ट्रपती पदक विजेते मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी हॉटेल कृष्णा इन येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यात अशोक राजपूत सर यांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा, कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचा, शिस्तप्रिय कार्यपद्धतीचा तसेच समाजाप्रती असलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रामाणिक व समर्पित सेवेमुळे त्यांनी पोलीस दलात तसेच समाजात एक वेगळी आदराची ओळख निर्माण केली आहे.यावेळी शिवराणा बहुउद्देशीय प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या संस्थापक अध्यक्षा सौ. छाया विजयसिंग महेर तसेच विजयसिंग महेर यांच्या वतीने अशोक राजपूत सर यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समाधान, शांतता व दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या भव्य सत्कार सोहळ्यास जिल्ह्यातील अनेक मान्यवर राजकीय नेते, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी अशोक राजपूत सर यांच्या कर्तृत्वाचा व प्रामाणिक सेवाभावाचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सरांची ३४ वर्षांची समर्पित सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि आदर्श कार्यपद्धती भावी पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.आपल्या कर्तृत्वाला मनापासून सलाम!
सेवानिवृत्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
संस्थापक अध्यक्षा : सौ. छाया विजयसिंग महेर
शिवराणा बहुउद्देशीय प्रतिष्ठान, महाराष्ट्र

No comments