adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ. आंबेडकर सभागृहाच्या जागेसाठी निलंग्यात उपोषण.

 डॉ. आंबेडकर सभागृहाच्या जागेसाठी निलंग्यात उपोषण.   लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) निलंगा : येथील अशोकनगर परिसर...

 डॉ. आंबेडकर सभागृहाच्या जागेसाठी निलंग्यात उपोषण. 


 लातूर, जि. प्र. (उत्तम माने )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

निलंगा : येथील अशोकनगर परिसरात गायरान जमिनीतील गट क्र. १७३ मध्ये २०० बाय १८० चौरस फूट जागा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहासाठी नगरपरिषदेला वर्ग करावी, या मागणीसाठी समाजबांधवांच्या वतीने बुधवारपासून (दि.१२) उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या ४० वर्षांपासून सदर जागेचा वापर विविध सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी केला जात आहे. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह सर्व महापुरुषांच्या जयंती नियमित साजऱ्या केल्या जातात. नगरपरिषदेमार्फत या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले आहे. तेथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी सदर जागा नगर परिषदेकडे वर्ग करावी, यासाठी उपोषण सुरू केले आहे. ठोस निर्णय झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा निर्धारही उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांमध्ये विलास सूर्यवंशी, अंकुश ढेरे, रजनीकांत कांबळे, प्रा. रोहित बनसोडे, धम्मानंद काळे, बंटी कांबळे, रामलिंग पटसाळगे, संदीप कांबळे, लहू ढेरे, संजय सोनकांबळे, भगवान कांबळे, अंकुश कांबळे, दिगंबर सूर्यवंशी, सुरेश कांबळे, दत्ता सूर्यवंशी, दत्ता शिंदे, अमित ढेरे, किरण कांबळे, अभय ढेरे, दीपक मंजुळे, नीलेश गायकवाड, चंद्रकांत भोसले, विशाल कांबळे, शंकर लोंढे, हिरालाल कांबळे, प्रकाश कांबळे, तानाजी सुरवसे, बालाजी कांबळे, देविदास धैर्य, अनंत काटेजवळगेकर, उल्हास वाघमोडे, विजयकुमार पाटील यांचा समावेश आहे.

No comments