सहकारमहर्षी स्व.बी.बी.आबापाटिल यांचा तैलचित्र अनावरण सोहळा श्रेष्ठ कर्मातच सत्यता, पवित्रता व सेवेची भावना असते..अरुणभाई गुजराथी चोपडा प्रति...
सहकारमहर्षी स्व.बी.बी.आबापाटिल यांचा तैलचित्र अनावरण सोहळा
श्रेष्ठ कर्मातच सत्यता, पवित्रता व सेवेची भावना असते..अरुणभाई गुजराथी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या प्रभु चिंतन भवन, ओमशांती नगर येथे नुकताच ग.स.चे शाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर गोरगावलेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सहकारमहर्षी स्व.बी.बी.आबापाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण श्री रेणुका देवी मंदिराचे पुजारी रामभाऊ बाविस्कर वडगावसिम यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओमशांती परिवाराच्या सर्वेसर्वा ब्रह्माकुमारी मंगलादीदी ह्या होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी बोलताना सांगितले की, श्रेष्ठ कर्मातच सत्यता, पवित्रता व सेवेची भावना असते. क्षेत्र कोणतेही असो अंतःकरणात सेवेचा भाव असला की सर्व कार्य श्रेष्ठ होत असतात. त्यांनी ब्रम्हाकुमारी मंगला दिदी, ग.स.संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.बी.बी.आबापाटील व सेवानिवृत्त शाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर यांच्या कार्याचा गौरव केला.
प्रारंभी दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन, ईशस्तवन व योगसाधना करण्यात आली. व्यासपीठावर माजी आमदार कैलास पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन घन:शाम पाटील, महिला नेत्या सौ.इंदिराताई पाटील, रामभाऊ बाविस्कर, प्रकाश पाटील, किरण पाटील, सौ.मेघा पाटील, प्रतिक पाटील, अनिल पाटील, शेषराव पवार, सौ.दिपाली पवार, बाजीराव बाविस्कर, सुनील सुर्यवंशी, मंगेश भोईटे, योगेश सनेर, मनोज माळी, विजय पवार, देवेंद्र पाटील, एकनाथ पाटील, दिलीप सपकाळे, राजेश शर्मा, राजेंद्र पाटील, स्तेपन सपकाळे, भुपेंद्र गुजराथी, श्रीमती.जावित्रीबाई बाविस्कर, सौ.सुमन पाटील, सौ.आशाबाई बाविस्कर यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक गुरुदत्त निंबाळे यांनी केले. तद्नंतर ब्रह्माकुमारी मंगलादीदी यांनी जगन्नाथ बाविस्कर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार केला. तसेच उपस्थितांना दादी प्रकाशमणीजी यांच्या एकोणिसाव्या स्मृतिप्रीत्यर्थ १० करोड नशामुक्त प्रतिज्ञा महाअभियान अंतर्गत नशामुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी मान्यवरांचीही भाषणे झालीत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओमशांती परिवाराच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. मंचसंचलन ब्रम्हाकुमारी शितल दिदी यांनी तर आभार प्रदर्शन सौ.रूपाली बाविस्कर यांनी केले. शेवटी सर्वांनी ब्रम्हाभोजनाचा लाभ घेतला.

No comments