adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घाडवेल गावात बिबट्याची दहशत? गायच्या पिल्लावर हिंस्र प्राण्याचा हल्ल्याचा संशय, वनविभागाच्या पाहणीनंतरच हल्लेखोर प्राण्याबाबत स्पष्टता होणार; पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण

  घाडवेल गावात बिबट्याची दहशत? गायच्या पिल्लावर हिंस्र प्राण्याचा हल्ल्याचा संशय वनविभागाच्या पाहणीनंतरच हल्लेखोर प्राण्याबाबत स्पष्टता होणा...

 घाडवेल गावात बिबट्याची दहशत? गायच्या पिल्लावर हिंस्र प्राण्याचा हल्ल्याचा संशय

वनविभागाच्या पाहणीनंतरच हल्लेखोर प्राण्याबाबत स्पष्टता होणार; पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण


अशोक कोळी, चोपडा

संपादक : हेमकांत गायकवाड

घाडवेल, ता. चोपडा : घाडवेल गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याची भीती पुन्हा एकदा निर्माण झाली असून, एका गायच्या पिल्लावर हिंस्र प्राण्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील पशुपालक तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण सखाराम पाटील यांच्या गोठ्यात असलेल्या गायच्या पिल्लावर हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर गोठा जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील परिसरात असल्याचे समजते. पिल्लाच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्याने त्याच्यावर एखाद्या हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची छायाचित्रे पाहता पिल्लाच्या शरीरावर हल्ल्याच्या खुणा दिसून येत असल्या, तरी हा हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला आहे कि  बिबट्यानेच केला आहे का, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी पाहणी व तपास केल्यानंतरच हल्लेखोर प्राण्याबाबत स्पष्टता होणे अपेक्षित आहे.

घाडवेल परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या वावराच्या चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे या घटनेने शेतकरी आणि पशुपालकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतशिवार तसेच गोठ्यांच्या परिसरात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, गोठ्याच्या परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था ठेवावी आणि नागरिकांनी अनावश्यकपणे रात्री शेतशिवारात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी, हल्ल्याचा तपास करावा आणि परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्यास त्याच्या बंदोबस्तासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

No comments