adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा  प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक- हेमकांत गायकवाड) मु...

सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 


प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर, दि. ५ सप्टेंबर २०२६ : सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत विविध भाषणे, कविता, गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत एक दिवसाचे अध्यापनही केले. त्यामुळे शाळेतील वातावरण आनंदमय व उत्साहपूर्ण झाले.

या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती स्मिता खर्चे मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे महत्त्व, शिक्षक-विद्यार्थी नाते तसेच शिक्षणातून घडणाऱ्या व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन श्री सागर मुंडके सर यांनी केले .

शाळेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे-खेवलकर, श्री. नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, स्कूल कमिटी अध्यक्ष श्री पुरुषोत्तम महाजन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे मॅडम यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केलेल्या प्रेमाचे व आदराचे त्यांनी कौतुक केले.

शिक्षक दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर, कृतज्ञता, आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम आनंददायी व संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला. 

No comments