adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सिद्धेश्वर नगर मोठ्या पुलाचे काम तातडीने सुरू करून वाहतुकीस खुला करा

सिद्धेश्वर नगर मोठ्या पुलाचे काम तातडीने सुरू करून वाहतुकीस खुला करा वरणगाव अरुण धनगर (संपादक : हेमकांत गायकवाड) वरणगाव सिद्धेश्वर नगर येथील...

सिद्धेश्वर नगर मोठ्या पुलाचे काम तातडीने सुरू करून वाहतुकीस खुला करा



वरणगाव अरुण धनगर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

वरणगाव सिद्धेश्वर नगर येथील मोठ्या पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र काम अद्याप अपूर्ण असून गेल्या १ महिन्यापासून काम बंद आहे. त्यामुळे सिद्धेश्वर नगर,वीर लहुजी-अण्णाभाऊ साठे नगर,सम्राट नगर,वेल्हाळे व मनारखेडा येथील विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुलाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून पूल वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी DRM ऑफिस भुसावळ येथे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना वरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कुंदन माळी व निलेश माळी यांनी निवेदनाद्वारे केली.

No comments