राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जे.ई. स्कूलच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश मुक्ताईनगर प्रतिनिधी : सतिश गायकवाड (संपादक : हेमकांत गायकवाड) मुक्त...
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जे.ई. स्कूलच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश
मुक्ताईनगर प्रतिनिधी : सतिश गायकवाड
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : स्व. बाबासाहेब के. नारखेडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या के. नारखेडे विद्यालय भुसावळ येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जे.ई. स्कूल व ज्युनि. कॉलेज, मुक्ताईनगरच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत विद्यालयाच्या देवश्री विकास पाटील (इयत्ता १० वी) हिने उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक, हेमांगी योगेश पाटील (इयत्ता ११ वी) हिने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तर कल्याणी भागवत तायडे (इयत्ता १२ वी) हिने उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
या विद्यार्थिनींनी सामाजिक, शैक्षणिक तसेच समकालीन विषयांवर प्रभावीपणे आपले विचार मांडत उपस्थितांची दाद मिळवली. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या संचालक मंडळाने तसेच प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही. के. शिर्के आणि सर्व पर्यवेक्षकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
या यशामागे विद्यालयाच्या उपशिक्षिका एस. एस. कोलते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक व वक्तृत्व क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.

No comments