वीर राघोजी भांगरे यांच्या संघर्षाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प... जगन्नाथ बाविस्कर यांची राज्य संपर्कप्रमुख पदावर नियुक्ती... चोपडा (प्रतिनि...
वीर राघोजी भांगरे यांच्या संघर्षाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प...
जगन्नाथ बाविस्कर यांची राज्य संपर्कप्रमुख पदावर नियुक्ती...
चोपडा (प्रतिनिधी)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
धाराशीव जिल्ह्यातील तारखेडा येथील सुहासिनी मंगल कार्यालयात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या राज्यस्तरीय प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते जळगाव अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांची महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख म्हणून बिनविरोध नियुक्ती व यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला. म.वाल्मिकींचे विचार व वीर राघोजी भांगरे यांच्या संघर्षाचा वारसा पुढे नेऊन आदिवासी कोळी लोकांच्या न्याय व हक्कांसाठी शासन प्रशासनाशी लढा देत राहु, असा संकल्प जगन्नाथ बाविस्कर यांनी यावेळी बोलुन दाखविला.
प्रास्ताविकात राज्य उपाध्यक्ष प्रा.बाळासाहेब बळवंतराव यांनी सांगितले की, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आणि सामाजिक न्यायासाठी आंदोलन उपोषण तसेच अन्नत्याग सत्याग्रहाच्या माध्यमातून संघर्ष करणारे श्री. बाविस्कर यांचे कार्य महाराष्ट्रभर समाज बांधवांपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या या संघर्षामुळे अनेक समाज बांधवांना जात प्रमाणपत्र व आवश्यक दाखले मिळवून देण्यासाठी जनजागृती व पाठपुरावा झाला असून या कार्यामुळे त्यांची महाराष्ट्रभर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण झाली आहे. याच सामाजिक कार्याची दखल घेऊन आणि राज्यातील विविध भागातील समाज बांधवांची प्रभावी संपर्क साधून संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर सर्वानुमते महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जळगाव येथील उपस्थित पदाधिकारी यांचीही विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. त्यात राज्य उपाध्यक्ष भिकाजी सोनवणे, खान्देश महिला विभागप्रमुख सौ.मंगला सोनवणे, जिल्हाध्यक्ष पंडित जोहरे, जिल्हासंपर्कप्रमुख अनिल कोळी, जिल्हा युवाध्यक्ष राज पाटील, महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती.स्नेहा सोनवणे, तालुकाध्यक्षा सौ.सुनिता सपकाळे, शहराध्यक्षा सौ.छाया कोळी, उपजिल्हा संपर्कप्रमुख सुधाकर बाविस्कर, उपजिल्हाध्यक्ष दिपक कोळी, महानगर अध्यक्ष रवींद्र कोळी, उपाध्यक्ष संजय बाविस्कर, जेष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष गोकुळ सुर्यवंशी, उपाध्यक्ष रतन बिऱ्हाडे, शहर सदस्य अनिल सपकाळे, शिवाजी सुर्यवंशी, निखिलदास साळुंखे, नरेंद्र सपकाळे, अक्षय सोनवणे, सतिष कोळी, गिरीश कोळी आदींना नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.

No comments