बापाचं पीक उन्हाने करपलं पोराचं पेपर व्यवस्थेने फोडलं. नियतीच्या कचाट्यात शेतकरी आणि विद्यार्थी. लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक : हेम...
बापाचं पीक उन्हाने करपलं पोराचं पेपर व्यवस्थेने फोडलं.
नियतीच्या कचाट्यात शेतकरी आणि विद्यार्थी.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक : हेमकांत गायकवाड)
शेतकऱ्याच्या पिकावर हवामानाचा घाला
विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील बदलांमुळे संभ्रम
मेहनतीपेक्षा व्यवस्थेच्या निर्णयांवर भविष्य अवलंबून?
लातूर :-बापाने आयुष्यभर कष्ट करून शेतात पीक उभं केलं; मात्र पावसाच्या लहरीपणासोबत उन्हाच्या तडाख्याने ते पीक करपलं. दुसरीकडे, मुलाने रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी केली; पण पेपर व्यवस्थेतील गोंधळ आणि बदललेल्या नियमांनी त्याच्या मेहनतीलाच धक्का दिला. एका घरात बापाच्या घामाची आणि पोराच्या स्वप्नांची अशी दुहेरी परीक्षा सुरू आहे.
आज प्रश्न केवळ बापाच्या करपलेल्या पिकाचा किंवा पोराच्या फोडलेल्या पेपरचा नाही; प्रश्न आहे तो व्यवस्थेच्या संवेदनशीलतेचा ! सामान्य माणूस संकटातून मार्ग काढत असताना त्याच्यावर नवे नियम, बदलते निकष आणि अनिश्चिततेची कुऱ्हाड का चालवली जाते? प्रश्न विचारणाऱ्यालाच देशद्रोही ठरवण्याऐवजी त्याच्या प्रश्नामागची वेदना समजून घेण्याची वेळ आली आहे. कारण शेतात बाप हरला आणि शिक्षणात पोरगा हरला, तर जिंकणार कोण?

No comments