पाचोरा उर्दू केंद्रीय स्तरावरील 'स्पेलिंग बी' स्पर्धाचा आयोजन पाचोरा येथील जी.पी स्कूलच्या मौलाना आझाद सभागृहात स्पेलिंग बी स्पर्ध...
पाचोरा उर्दू केंद्रीय स्तरावरील 'स्पेलिंग बी' स्पर्धाचा आयोजन
![]() |
| पाचोरा येथील जी.पी स्कूलच्या मौलाना आझाद सभागृहात स्पेलिंग बी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना केंद्र प्रमुख शेख जावेद रहीम, प्राचार्य आणि शिक्षक. |
लियाकत शहा सर जळगांव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या निर्देशानुसार आणि पाचोरा गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, उर्दू केंद्रीय स्तरावरील 'स्पेलिंग बी' स्पर्धेचे शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मौलाना आझाद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत उर्दू जिल्हा परिषदेच्या १८ शाळांमधील ६६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. तर रेहान खान, सय्यद फैजान, नगमा फातिमा आणि सना फिरदौस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यास, त्यांची शब्दसंपदा वाढवण्यास आणि त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत करणे, हा या स्पर्धेचा उद्देश होता.
केंद्रीय स्तरावर यशस्वी झालेले विद्यार्थी शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या तालुका स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र ठरतील. गटशिक्षणाधिकारी पवार यांनी उर्दू विभागाच्या उत्कृष्ट तयारीची आणि कामगिरीची प्रशंसा केली.
प्राचार्य एजाज बागवान, अल्ताफ हुसेन, रईस सुभान, अशफाक शेख, कादिर शेख, मोमिन अब्दुल मलिक, मोईन सय्यद, रुकय्या शेख, समिना शेख, उझमा फातिमा आणि मजीदा अंजुम यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले.

No comments