आत्महत्या आत्महत्या करणे म्हणजे स्वत:ची हत्या करणे सर्वात श्रेष्ठ मनुष्यजन्म लाभलेला असतानांच का म्हणून आपले जीवन संपवत असेल हा मानव? याचा...
आत्महत्या
आत्महत्या करणे म्हणजे स्वत:ची हत्या करणे सर्वात श्रेष्ठ मनुष्यजन्म लाभलेला असतानांच का म्हणून आपले जीवन संपवत असेल हा मानव? याचा विचार केला तर मन सुन्न होते. हृदयात चलबिचल होते .
उच्चशिक्षित कुटुंबाने आर्थिक विवंचनेतून एकत्र जीवन संपविले तर एका तरुण आयटी अभियंताने १५ व्या मजल्या वरून उडी मारून जीवन संपविले. लहान लहान बालकांना विहिरीत फेकणारी महिला आपल्या बालकांना ठार करतांना एवढ काळीज कठोर का बरे करीत असेल? 'शामची आई' पुस्तकातून संस्कारक्षम जीवन कसे जगावे? याचा पाठ शिकविणारे साने गुरुजी का बरे आपले जीवन संपवतात? तर जीवनात आलेले नैराश्य. नैराश्य झटकून प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारे या चक्रव्यूहातून बाहेर पडणारे तरुणच पुढे यशस्वी होतांना दिसतात. नैराश्याच चक्रव्यूह जो भेदु शकत नाही तो आपले जीवन संपवतो व या जगातून आपणा सर्वांना सोडून निघून जातो
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या (NCRB) अहवालानुसार भारतात सन 2023 मध्ये १७१४१८ लोकांनी आत्महत्या केली म्हणजे दररोज सरासरी ४७० हून अधिक तर दर ३ मिनिटाला एक व्यक्ती आत्महत्या करतो. शिक्षण, करिअर आणि आर्थिक सुस्थिती लाभलेली माणसेही आतून इतकी असुरक्षित होतांना का दिसतात ? याचे उत्तर शोधणे अत्यंत आवश्यक आहे.
पवित्र कुरआन मध्ये आत्महत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. तुम्हाला ' अल्लाहने दिलेले श्रेष्ठत्व प्रदान करण्यात आलेले जीवन' संपवू नका आत्महत्या करू नका असा संदेश मोहम्मद पैंगंबरानी सुद्धा दिलेला आहे. कारण कितीही मोठे असो आपले जीवन संपवू नका आत्महत्या करू नका व आपल्या लहान निरागस बालकांचा जीवनप्रवास थांबवू नका असे आवाहन मी करीत आहे.
अब्दुल सरदार पटेल
चोपडा 8766747092

No comments