adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई जनतेच्या तक्रारींची दखल घेत महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची मोठी कारवाई !

रावेरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई  जनतेच्या तक्रारींची दखल घेत महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब ...

रावेरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई 

जनतेच्या तक्रारींची दखल घेत महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची मोठी कारवाई !




रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


रावेर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी प्रकरणांमध्ये झालेला विलंब, कामकाजातील अनियमितता आणि कर्तव्यातील कसूर याबाबत प्राप्त तक्रारींची विभागीय चौकशी करण्यात आली.

या चौकशीनंतर रावेर भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार निलंबित करण्याचे आदेश उपसंचालक, भूमी अभिलेख, नाशिक प्रदेश यांच्याकडून जारी करण्यात आले आहेत.

या प्रकरणात आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जनतेच्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर झालेल्या प्रशासकीय चौकशीत दोषी आढळून आल्यानंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

“जनतेच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही

No comments