adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मयुरेश धनगर प्रथम

  जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मयुरेश धनगर प्रथम चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी (संपादक : हेमकांत गायकवाड) म्हसावद येथील स्वा. सै. पं. ध. थैपेड...

 जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मयुरेश धनगर प्रथम





चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


म्हसावद येथील स्वा. सै. पं. ध. थैपेड़े माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद येथील इयत्ता १० वी ‘अ’ मधील विद्यार्थी मयुरेश महेंद्र धनगर याने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

कै. सुशीलाताई गुलाबराव पाटील स्मृतिप्रीत्यर्थ अमर संस्था, चोपडा यांच्या वतीने दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत द्वितीय गट (इयत्ता ६ वी ते १० वी) मध्ये मयुरेश धनगर याने प्रथम क्रमांक मिळविला.

स्पर्धेतील उत्कृष्ट वक्तृत्वामुळे मयुरेशच्या या यशाचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले. त्याला गट विकास अधिकारी चोपडा मा,अंजली बर्गे सुनील बाविस्कर सर, जेडीसीसी सेवानिवृत्त मॅनेजर साहेब श्री डी बी पाटील ,दिनेश बाविस्कर, दिपक पाटील केंद्रप्रमुख, डी आर पाटील सर, ए एल सोनवणे सर, के टी महाजन सर,या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मयुरेशच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले. “थैपेड़े विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments