सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोकुळाष्टमी हर्षोल्लास व उत्साहात साजरी भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : दि...
सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोकुळाष्टमी हर्षोल्लास व उत्साहात साजरी
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : दि . ४ सप्टेबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल, यावल येथे शाळेचे अध्यक्ष डॉ श्री प्रदीप माहेश्वरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिला तायडे मॅडम यांच्या उपस्थिती गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचा परिसर आकर्षक फुलांची सजावट, राधा-कृष्णाच्या वेशभूषा आणि सुंदर रंगसजावटीने सजवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .शीला तायडे मॅडम यांच्या हस्ते नटखट अश्या श्रीकृष्ण भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री गोपाल कृष्णाला पाळण्यात टाकून पाळणा गीत म्हणण्यात आले .इयत्ता नर्सरी ते तिसरीच्या वर्गातील
विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीला, भक्तिगीते, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उत्सवात रंग भरला. दहीहंडीचा कार्यक्रम हा विशेष आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत “गोविंदा आला रे!” च्या जयघोषात वातावरण आनंदमय केले.
या उत्सवातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा, एकता, सहकार्य आणि संघभावनेचे महत्त्व समजले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सुंदर कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिला तायडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. “नंदाच्या घरी आनंद झाला, जय कन्हैयालाल की!”
भक्ती, संस्कृती आणि आनंदाचा सुंदर संगम म्हणजे गोकुळाष्टमी!
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

No comments