adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बारकोड असलेल्या जन्म - मृत्यू दाखल्याच्या नोंदी तात्काळ मिळाव्या (जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फैजपूर उपनगराध्यक्षांची निवेदनाद्वारे मागणी )

 बारकोड  असलेल्या जन्म - मृत्यू दाखल्याच्या नोंदी तात्काळ मिळाव्या   (जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फैजपूर उपनगराध्यक्षांची निवेदनाद्वारे मागणी...

 बारकोड  असलेल्या जन्म - मृत्यू दाखल्याच्या नोंदी तात्काळ मिळाव्या 

 (जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फैजपूर उपनगराध्यक्षांची निवेदनाद्वारे मागणी ) 


इदू पिंजारी फैजपुर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 फैजपूर नगर परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत देण्यात येत असलेल्या जन्म व मृत्यू दाखल्याच्या ऑनलाईन प्रणालीच्या (बारकोड असलेल्या) नोंदी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना याबाबत मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामागील मुख्य कारण असे की (बारकोड) ऑनलाईन प्रणालीच्या जन्म मृत्यूच्या नोंदी या जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची ऑनलाईन मंजुरी मिळाल्यानंतर फैजपुर नगर परिषदेत हे दाखले वितरित करण्यात येतात परंतु गेल्या चार महिन्यापासून नगरपरिषदेत जवळपास 250 च्यावर दाखले वितरण प्रलंबित असल्यामुळे या विषया संदर्भात आज दिनांक 1सप्टेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची फैजपुर  नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विनोद( पप्पू) चौधरी यांनी भेट घेऊन या संदर्भात निवेदन सादर करून या प्रणालीद्वारे येत असलेल्या त्रुटी व याबद्दल होणारी नागरिकांची हेळसांड या विषई संबंधित अधिकाऱ्यांच्या सदरील अडचणी निदर्शनास आणून तात्काळ यावरती जलद कार्यवाही करून या मंजुरी त्वरित मिळाव्या याबाबत निवेदन सादर केले सदरील निवेदनात 1)संबंधित नोंदी तात्काळ मंजूर होऊन मिळाव्या

2) एक लॉगीन न देता विविध लॉगिन आयडी मिळाल्यास एकाच वेळी जास्त दाखले वितरित करता येतील 

3) किंवा नोंदी मंजुरीचे अधिकार पूर्वीप्रमाणे नगरपरिषदेला प्रधान करण्यात यावे या मुख्य अटी सदरील निवेदनात नमूद करून या सोडविण्याची विनंती यावेळी करण्यात आली यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन एक संपूर्ण दिवस या विषयासाठी देऊन संपूर्ण एका दिवसात या सर्व नोंदी क्लियर करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

 सदरील निवेदन स्वीकारताना जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भाएकर, आरोग्य विभागाचे अधिकारी श्री किरण पराशर, श्री मनचरे साहेब व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 या निवेदनाची प्रत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना सुद्धा देण्यात आलेली आहे.

 याबाबत फैजपूर च्या नगराध्यक्ष  सौ दामिनी पवन सराफ यांनी सुद्धा संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याचे यावेळी कळविण्यात आले.

No comments