adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुण्याच्या साईभक्ताचा नवस पुर्ण झाला ! साईचरणी सोन्याचा मुकुट अर्पण केला !!

  पुण्याच्या साईभक्ताचा नवस पुर्ण झाला ! साईचरणी सोन्याचा मुकुट अर्पण केला !! अयुब पठाण / शिर्डी (संपादक : हेमकांत गायकवाड) जगदगुरु श्री साई...

 पुण्याच्या साईभक्ताचा नवस पुर्ण झाला !

साईचरणी सोन्याचा मुकुट अर्पण केला !!




अयुब पठाण / शिर्डी

(संपादक : हेमकांत गायकवाड)

जगदगुरु श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून अनेक भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. याच भावनेतून गुरुवार दि.१० सप्‍टेंबर २०२६ रोजी, पुणे येथील साईभक्त श्री.विकास ताराचंद चोपकर यांनी श्री साईबाबांच्या चरणी ९० ग्रॅम ९७० मिली ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला.

या सुवर्ण मुकुटाची देणगी मुल्‍य सुमारे १२ लाख ८२ हजार ४९५ रुपये असून, भाविकांच्या श्रद्धा व भक्तीचे हे एक अनमोल प्रतीक आहे. 

यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडिलकर, साई मंदिर अधिकारी श्री मते , पुजारी, कर्मचारी, साईं भक्त आदि उपस्थित होते. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते दानशूर साईभक्त श्री. विकास ताराचंद चोपकर यांचा सत्कार करण्यात आला.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments