adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मांजरीतील २८ अतिक्रमणधारकांच्या घरकुल प्रस्तावांना अखेर गती! एकलव्य आदिवासी आघाडीच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; पंचायत समितीकडे लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर

मांजरीतील २८ अतिक्रमणधारकांच्या घरकुल प्रस्तावांना अखेर गती! एकलव्य आदिवासी आघाडीच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; पंचायत समितीकडे लाभार...

मांजरीतील २८ अतिक्रमणधारकांच्या घरकुल प्रस्तावांना अखेर गती!

एकलव्य आदिवासी आघाडीच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; पंचायत समितीकडे लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर




राहुरी, प्रतिनिधी : कवाणे शंकर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


मांजरी (ता. राहुरी) येथील आदिवासी समाजातील अतिक्रमणधारकांच्या जागा त्यांच्या नावावर करण्यासह पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून करण्यात येत असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.एकलव्य आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष साईनाथ बर्डे व जिल्हा महासचिव संदीप बर्डे यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

या पाठपुराव्याचा भाग म्हणून मांजरी गावातील २८ लाभार्थ्यांचे प्रस्ताव राहुरी पंचायत समितीकडे सादर करण्यात आले.यावेळी आदिवासी समाजातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने पंचायत समिती येथे उपस्थित होते. उपस्थितांच्या वतीने संबंधित प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले.

अतिक्रमणधारकांच्या जागा नावावर होणे आणि पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळणे हा आदिवासी समाजातील अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नासाठी गेल्या तीन वर्षांपासून एकलव्य आदिवासी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.अखेर २८ लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी एकलव्य आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष साईनाथ बर्डे,जिल्हा महासचिव संदीप बर्डे,महिला तालुकाध्यक्ष संगीता बर्डे,तालुकाध्यक्ष पोपट माळी यांच्यासह युवा कार्यकर्ते चंदू गायकवाड,सागर माळी,राधाकिसन माळी, राजेंद्र पवार,पोपट ठाकर,सोन्याबापू ठाकर,बाप्पू बर्डे,कचरू माळी,राजू हनुमंत, बाबासाहेब माळी, शुभम माळी, विनायक बर्डे, ताई ठाकर, गोरख माळी, सूर्यकांत गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, विजय माळी, हिराबाई मोरे, भाऊराव ठाकर, संतोष माळी, मिराबाई बर्डे, वसंत मोरे, मनीषा बर्डे, भागवत हनवत आदी महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता सादर करण्यात आलेल्या २८ प्रस्तावांची नियमानुसार तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना पुढील प्रशासकीय कार्यवाहीतून घरकुलाचा लाभ मिळावा, तसेच अतिक्रमणधारकांच्या जागांबाबतही शासनाच्या नियमानुसार सकारात्मक कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

No comments