adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बहुजन विकास आघाडीचा वतीने महिलांना विविध योजनांची माहिती.. माहिती अभावी एक ही महिला वंचित नको रूचिता अमित नाईक

बहुजन विकास आघाडीचा वतीने महिलांना विविध योजनांची माहिती.. माहिती अभावी एक ही महिला वंचित नको रूचिता अमित नाईक नालासोपारा प्रतिनिधी  (संपादक...

बहुजन विकास आघाडीचा वतीने महिलांना विविध योजनांची माहिती..

माहिती अभावी एक ही महिला वंचित नको रूचिता अमित नाईक




नालासोपारा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


नालासोपारा ता, २७ :- लोकनेते आ. हितेंद्र ठाकुर मा. आ. क्षितीज ठाकुर व महापौर अजीव पाटील,उपमहापौर मार्शल लोपीस, जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांच्या मार्गदर्शनाखाली

बहुजन विकास आघाडीच्या च्या वतीने आम्ही नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहिलो आहोत.

महिलांनाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी व महिलांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी समाजसेविका रूचिता नाईक यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र,११ मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. 

महिलांनी केवळ चूल आणि मूल यात न अडकता आत्मनिर्भर होऊन कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा आणि समाजात सन्मानाने जगावे यासाठी महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात,यासाठी वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून व इतर अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. 

पक्षाच्या वतीने नालासोपारातील महिला भगिनींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या काही प्रमुख योजनांची माहिती समाजसेविका रूचिता नाईक यांनी दिल्या. 

महानगरपालिकेच्या सर्व योजना व इतर लाभ गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्या सेवेत तत्पर आहेत. 

पक्षाच्या वतीने आम्ही तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर सर्वतोपरी मदत करू, हीच आमची ग्वाही!

कुटुंबातील महिला सक्षम असेल तर, संपूर्ण कुटूंब सक्षम होत, पक्षातील महिला संघटन सक्षम असेल तर संपूर्ण पक्षाची ताकत अनेकपटीने वाढते, 

महिलांच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे उभ राहण त्यांच्या अडचणी समजून घेण आणि त्या आप्पांच्या माध्यमातून सोडवणे हिच आपली जबाबदारी.

प्रभाग क्रमांक ११ मधील महिलांची बैठक घेऊन त्यांचा विविध अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या, महिलांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य पातळीवर पाठपुरावा काढण्याचा प्रयत्न राहिल.समजातील प्रत्येक महिलेचा आवाज एकला जावा आणि त्यांचा समस्यांना न्याय मिळावा यासाठी सदैव कटीबद्ध आहोत.

No comments