adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली येथे विधी सेवा शिबिर उत्साहात संपन्न

अंतुर्ली येथे विधी सेवा शिबिर उत्साहात संपन्न अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले  (संपादक : हेमकांत गायकवाड) अंतुर्ली : तालुका विधी सेवा समिती, म...

अंतुर्ली येथे विधी सेवा शिबिर उत्साहात संपन्न




अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


अंतुर्ली : तालुका विधी सेवा समिती, मुक्ताईनगर व तालुका वकील संघ, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अंतुर्ली येथे विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध कायदेशीर बाबी, नागरिकांचे हक्क तसेच उपलब्ध असलेल्या विधी सेवा सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी Plea Bargaining या विषयावर ॲड. डॉ. उल्हास पाटील व ॲड. प्रफुल्ल किशोर मेढे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विधी सेवा समितीच्या (PLV) सदस्य जयश्री राजाराम बेलदार व सुष्मिता किशोर सोनटक्के उपस्थित होत्या.

तसेच गावातील श्री. एस. एस. भोई सर, गावाचे पोलीस पाटील किशोर मेढे,अनिल वाडीले,शेख भैया करीम, सुंदर पातोंडीचे भागवत बावस्कर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरामध्ये नागरिकांना मोफत विधी सेवा, कायदेशीर हक्क, लोकअदालतीचे महत्त्व आणि गरजू नागरिकांना उपलब्ध असलेल्या कायदेशीर सहाय्याबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अंतुर्ली यांनी मोलाचे सहकार्य केले. नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हे विधी सेवा शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.

No comments