आमदार चरणसिंग ठाकूर यांचा वाढदिवस विविध विकासकामे व उपक्रमांनी साजरा; ‘वरूड केसरी’ विशेषांकाचे थाटात प्रकाशन विधान परिषद आमदार राजूजी पोतदा...
आमदार चरणसिंग ठाकूर यांचा वाढदिवस विविध विकासकामे व उपक्रमांनी साजरा;
‘वरूड केसरी’ विशेषांकाचे थाटात प्रकाशन
विधान परिषद आमदार राजूजी पोतदार यांच्या अध्यक्षतेत भव्य नागरी सत्कार; ढिवरवाडीत सिट्रस इस्टेटचे भूमिपूजन, काटोलमध्ये रानभाजी महोत्सव
काटोल (जि.नागपूर) प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरणसिंगजी ठाकूर यांचा वाढदिवस विविध विकासकामांचा शुभारंभ, शेतकरीहिताचे उपक्रम, धार्मिक कार्यक्रम आणि भव्य नागरी सत्काराच्या माध्यमातून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सांध्य दैनिक ‘वरूड केसरी’च्या विशेषांकाचे प्रकाशन, ढिवरवाडी येथील सिट्रस इस्टेटच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन, रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विधान परिषद आमदार राजीवजी पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी आमदार चरणसिंगजी ठाकूर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधान परिषदेचे आमदार श्री. राजूजी पोतदार यांनी भूषविले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.काटोल येथे आयोजित कार्यक्रमात सांध्य दैनिक ‘वरूड केसरी’च्या विशेषांकाचे प्रकाशन आमदार चरणसिंगजी ठाकूर व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते झाले. या विशेषांकात आमदार ठाकूर यांच्या सामाजिक, राजकीय व विकासाभिमुख कार्याचा तसेच मतदारसंघातील योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. यावेळी काटोल नगरपालिकेच्या गटनेत्या सौ वैशालीताई ठाकूर, नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती सुभाष कोठे, शिक्षण सभापती विजय महाजन, नगरसेवक राजुजी ठाकूर, मनोज सावल,भूषण भोयर, आमदारांच्या धर्मपत्नी सौ. वंदनाताई ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कृषी विभागांतर्गत मौजा ढिवरवाडी (ता. काटोल) येथे सिट्रस इस्टेटच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आमदार ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. या इमारतीमुळे प्रशासकीय कामकाज सक्षम होऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक सेवा व तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यास मोठी मदत होणार आहे. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा सिट्रस इस्टेटच्या अध्यक्षा प्रज्ञा भगत गोळघाटे, माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, शेतकरी प्रतिनिधी दिनेश ठाकरे, डॉ. मेघा डहाळे, मनोज जंवजाळ, प्रशांत कुकडे, उपविभागीय कृषी अधिकारी बळीराम सातपुते, तालुका कृषी अधिकारी दिपाली कुंभार, कार्तिक कोळी, पंकज बसोड यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.काटोल येथे कृषी विभागातर्फे आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटनही आमदार ठाकूर यांच्या हस्ते झाले. पौष्टिक व औषधी रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यानंतर आमदार ठाकूर यांनी श्री चक्रधर स्वामी मंदिर देवस्थान येथे दर्शन घेतले. देवस्थानच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी ₹ ४२ कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विविध विकासकामांचे लोकार्पण-भूमिपूजन आणि नागरी प्रेमाच्या साक्षीने साजरा झालेला हा वाढदिवस मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरला.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार प्रविण सावरकर
(वरुड जि.अमरावती)
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments