adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एक वर्षापासून ग्रामसभा नाही; म्हैसवाडी (तेलखेड) ग्रामपंचायतीला ग्रामस्थांचे टाळे! ग्रामसेवक मुख्यालयी हजर राहत नसल्याचा आरोप; सरपंच (प्रशासक) व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी

एक वर्षापासून ग्रामसभा नाही; म्हैसवाडी (तेलखेड) ग्रामपंचायतीला ग्रामस्थांचे टाळे! ग्रामसेवक मुख्यालयी हजर राहत नसल्याचा आरोप; सरपंच (प्रशासक...

एक वर्षापासून ग्रामसभा नाही; म्हैसवाडी (तेलखेड) ग्रामपंचायतीला ग्रामस्थांचे टाळे!

ग्रामसेवक मुख्यालयी हजर राहत नसल्याचा आरोप; सरपंच (प्रशासक) व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी









मलकापूर प्रतिनिधी : अमोल बावस्कर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


मलकापूर- गट ग्रामपंचायत म्हैसवाडी (तेलखेड) येथे गेल्या वर्षभरापासून ग्रामसभा घेण्यात आली नसल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याने ग्रामस्थांनी कार्यालयाला कुलूप ठोकून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले याबाबत बंद ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देण्यात आले.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामसेवक नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे कार्यालय अनेकदा बंद असते. त्यामुळे गावातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय दाखले, पाणीपट्टी, घरपट्टी तसेच इतर ग्रामपंचायतशी संबंधित कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामसभा नियमितपणे घेणे आवश्यक असताना, गेल्या एक वर्षापासून ग्रामसभा झालेली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.तसेच १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणारी विशेष ग्रामसभाही घेण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे.या प्रकरणी गजानन मधुकर धाडे व समस्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मलकापूर यांच्याकडे निवेदन सादर करून ग्रामपंचायतीच्या कारभाराची तात्काळ चौकशी करावी, तसेच दोषी आढळल्यास सरपंच (प्रशासक) व ग्रामसेवक यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.यावेळी गजानन धाडे, अनंता गायगोळ, हरी धाडे, विजय धाडे, कुंदन धाडे, विवेक नारखेडे, मुरली तायडे, संकेत शेलकर, नीना तांबे, विशाल लोणे, महेश धाडे, प्रवीण धाडे, रामेश्वर सुरलकर, रामेश्वर धाडे, अंबादास धाडे, राजू शीरसाठ, संजय खवले, श्रीकृष्णा धाडे यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालय नियमित सुरू राहावे, ग्रामसभा तातडीने घेण्यात यावी आणि ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

No comments