गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी विद्युत विभागाची प्रतिबंधात्मक उपाययोजना विद्युत वाहिन्यांमुळे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सर्व्हिस वायर व गार्डि...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी विद्युत विभागाची प्रतिबंधात्मक उपाययोजना
विद्युत वाहिन्यांमुळे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सर्व्हिस वायर व गार्डिंगची उंची वाढविली
फैजपूर प्रतिनिधी इदु पिंजारी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान विद्युत वाहिन्यांमुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये तसेच मिरवणूक सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी विद्युत विभागाकडून मिरवणूक मार्गावर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या.
मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व्हिस वायर तसेच गार्डिंगची उंची आवश्यकतेनुसार वाढविण्यात आली. उंच वाहने, बँड तसेच गणेशमूर्तींच्या मार्गक्रमणाच्या दृष्टीने विद्युत वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राहावे, यासाठी संबंधित ठिकाणी तांत्रिक काम करण्यात आले. संभाव्य विद्युत अडथळे लक्षात घेऊन सुरक्षेला प्राधान्य देत ही कार्यवाही करण्यात आली.
उपकार्यकारी अभियंता नितीन पाटील व सहायक अभियंता देवेंद्र महाजन यांच्या निदर्शनाखाली हे काम करण्यात आले. या पथकामध्ये लाईनमन किरण पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ राकेश पाटील, विशाल चौधरी, वैभव नेमाडे, डीगंबर झोपे, तसेच विद्युत सहायक अनुप ठवकर व रोहित ठवकर यांचा समावेश होता.
गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्युत यंत्रणेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि मिरवणूक मार्गावरील संभाव्य विद्युत अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने विभागाने ही कार्यवाही केली. त्यामुळे मिरवणुकीदरम्यान उंच वाहने व गणेशमूर्ती नेताना विद्युत वाहिन्यांपासून आवश्यक सुरक्षित अंतर राखण्यास मदत होणार आहे.

No comments