adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे चोपडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे चोपडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा;  आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाला...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे चोपडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा;  आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन







चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा तालुक्यात यंदा निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता चोपडा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकरी व शेतमजुरांना आवश्यक शासकीय मदत, सवलती व उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी तहसीलदार, चोपडा यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता डॉ. चंद्रकांत बारेला, तालुकाध्यक्ष दिनेश बाविस्कर, विधानसभा क्षेत्र प्रमुख सचिन डाभे, अमोल भाऊ राजपूत, शहराध्यक्ष समाधान पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


तसेच भिल आदिवासी समाजाच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रश्नांबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती चोपडा यांना स्वतंत्र निवेदन देण्यात आले. आदिवासी समाजाच्या मूलभूत सुविधा, विकासकामे तसेच शासनाच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांना प्रभावीपणे लाभ मिळावा आणि समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


या निवेदनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार – आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष सखाराम सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत वाघ, आदिवासी सेलचे अतुल भिल, सुशील सोनवणे, गुरुदास भिल, सुभाष भिल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण जनतेला तातडीने दिलासा मिळावा तसेच भिल आदिवासी समाजाच्या न्याय्य मागण्यांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

No comments