adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संत्रानगरी वरूडमध्ये भव्य-दिव्य दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न ! रिलस्टारच्या उपस्थितीने युवकांमध्ये जल्लोष; नवनीत राणा यांच्या उपस्थितीने महिलांची मोठी गर्दी

 संत्रानगरी वरूडमध्ये भव्य-दिव्य  दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न ! रिलस्टारच्या उपस्थितीने युवकांमध्ये जल्लोष; नवनीत राणा यांच्या उपस्थितीने ...

 संत्रानगरी वरूडमध्ये भव्य-दिव्य  दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न !

रिलस्टारच्या उपस्थितीने युवकांमध्ये जल्लोष; नवनीत राणा यांच्या उपस्थितीने महिलांची मोठी गर्दी

कालभैरव गोविंदा पथकाने ४२ सेकंदांत २८ फुटांची दहीहंडी फोडत पटकाविला प्रथम क्रमांक




वरूड (जि.अमरावती) प्रतिनिधी:

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने संत्रानगरी वरूड ( जि.अमरावती)  शहरात भारतीय जनता पार्टी मोर्शी - वरुड विधानसभा मतदारसंघ व आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ आत्मारामजी यावलकर द्वारा आयोजित भव्य- दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. नगर परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात झालेल्या या उत्सवाला नागरिक, महिला, युवक तसेच राजकीय कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमास माजी खासदार सौ. नवनीत राणा यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे महिला व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या वेळी प्रामुख्याने आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांची उपस्थिती लाभली  तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध रिलस्टार साहिल कडक, श्रुतीका गावंडे, राजेश्वरी सरभुकन, रविकिरण कांडलकर व रवि वानखडे यांच्या उपस्थितीने युवकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला.

 रिलस्टारच्या उपस्थितीत युवकांनी मोठा जल्लोष केला

दहीहंडी उत्सवाला यंदा राजकीय रंगही चांगलाच चढल्याचे पाहायला मिळाले. माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भाषणातून आजी-माजी राजकीय नेत्यांवर केलेल्या आक्रमक वक्तव्यांमुळे कार्यक्रमस्थळी राजकीय वातावरण तापले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

दरम्यान, दहीहंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथकांनी थरारक कामगिरी केली. कालभैरव गोविंदा पथकाने अवघ्या ४२ सेकंदांत २८ फुटांवरील दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक पटकावला. या पथकाला १ लाख १ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले.

योद्धा वॉरिअर गोविंदा पथकाने १८.८१ सेकंदांत २५ फुटांवरील दहीहंडी फोडून द्वितीय क्रमांक पटकावला. या पथकाला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर जय भोले गोविंदा पथकाने २५.४४ सेकंदांत २५ फुटांवरील दहीहंडी फोडून तृतीय क्रमांक पटकावला असून त्यांना ३१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाचे गोविंदा पथक, युवक व उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. उत्सवाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. मोठ्या संख्येने झालेल्या गर्दीमुळे नगर परिषद मराठी शाळेचे प्रांगण परिसरात उत्सवाचे स्वरूप भव्य झाले होते. 

---------------------------------------------

वृत्त विशेष महत्त्व

पत्रकार प्रविण सावरकर - वरुड 

---------------------------------------------

वृत प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर -9561174111

No comments