खामगावात गणेशोत्सवाची सांगता उत्साहात व शांततेत; पोलीस प्रशासन, नगर परिषद व मुस्लिम समाजाचे विशेष सहकार्य खामगाव तालुका प्रतिनिधी (संपादक ...
खामगावात गणेशोत्सवाची सांगता उत्साहात व शांततेत; पोलीस प्रशासन, नगर परिषद व मुस्लिम समाजाचे विशेष सहकार्य
खामगाव तालुका प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
खामगाव : शहरात यंदाचा गणेशोत्सव उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात पार पडला. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने केलेले उत्कृष्ट नियोजन, खामगाव नगर परिषदेचे विशेष योगदान तसेच मुस्लिम समाजाने दिलेले सहकार्य यामुळे शहरातील गणेशोत्सवाची मिरवणूक शांततेत आणि उत्साहात संपन्न झाली.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. विविध गणेशोत्सव मंडळांनीही प्रशासनाला सहकार्य करत उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
यासोबतच खामगाव नगर परिषदेनेही विशेष योगदान देत आवश्यक सुविधा व व्यवस्थापनात सहकार्य केले. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी एकोप्याने प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली.
विशेष म्हणजे, मुस्लिम समाजानेही गणेशोत्सवाच्या काळात दिलेले अलौकिक सहकार्य आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी घेतलेली सकारात्मक भूमिका चर्चेचा विषय ठरली. विविध
समाजघटकांनी एकमेकांना सहकार्य करत शहरातील शांतता व सामाजिक एकोपा कायम ठेवला.
या सर्वांच्या सहकार्यामुळे खामगाव शहरातील गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक उत्साहात, शांततेत आणि आनंदी वातावरणात संपन्न झाली.
“गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!”
या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

No comments