कोळन्हावी चौफुलीवर वनविभागाची धडक कारवाई विनापास पंचराज जळाऊ लाकडाची वाहतूक उघड; वाहनासह १३ घनमीटर लाकूड जप्त यावल प्रतिनिधी आदित्य गजरे ...
कोळन्हावी चौफुलीवर वनविभागाची धडक कारवाई विनापास पंचराज जळाऊ लाकडाची वाहतूक उघड; वाहनासह १३ घनमीटर लाकूड जप्त
यावल प्रतिनिधी आदित्य गजरे
(संपादक : हेमकांत गायकवाड)
किनगाव–जळगाव मार्गावरून विनापास पंचराज जळाऊ लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर यावल वनविभागाच्या गस्ती पथकाने कोळन्हावी चौफुलीवर सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत टाटा ७०९ वाहन (MH-18-D-7454) ताब्यात घेण्यात आले असून, त्यामधून अंदाजे १३.०० घनमीटर पंचराज जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले.दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी वाहनाला थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहन जागेवरच सोडून लगतच्या केळीच्या बागेच्या दिशेने धूम ठोकली. वन कर्मचाऱ्यांनी परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र चालकाचा ठावठिकाणा लागला नाही.यानंतर पंचांच्या उपस्थितीत वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड आढळून आले. लाकडाच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वैध पास किंवा परवाना उपलब्ध नसल्याने वन विभागाने वाहन व लाकूड ताब्यात घेतले.जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी मुख्य विक्री केंद्र, यावल येथे जमा करण्यात आला आहे. याप्रकरणी वन गुन्हा क्र. २१/२०२६ अन्वये कार्यवाही करण्यात आली असून, पुढील तपास वनपाल वागझिरा करीत आहेत.ही कारवाई उपवनसंरक्षक सौरिष सहाय, विभागीय वनाधिकारी (दक्षता) राजेंद्र सदगीर व सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील, वनपाल संजय पाटील, वनरक्षक सतीश वाघमारे व आय. बी. चव्हाण यांनी केली.

No comments