adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोठा वाघोदा उर्दू शाळा ISO मानांकनाच्या दिशेने! शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता व विविध उपक्रमांवर भर

मोठा वाघोदा उर्दू शाळा ISO मानांकनाच्या दिशेने! शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता व विविध उपक्रमांवर भर सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक : हेमक...

मोठा वाघोदा उर्दू शाळा ISO मानांकनाच्या दिशेने!

शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता व विविध उपक्रमांवर भर




सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


मोठा वाघोदा बुद्रुक ता. रावेर येथील उर्दू शाळेने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच शाळेतील स्वच्छता, शिस्त, सुरक्षितता, विद्यार्थी सुविधा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून ISO मानांकनाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकवृंदाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक नोंदी अद्ययावत ठेवणे तसेच शाळेतील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात गुणवत्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, जनजागृतीपर उपक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मदत होत आहे.

ISO मानांकनाच्या प्रक्रियेमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित होण्यास मदत होणार असून, यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे.

मोठा वाघोदा उर्दू शाळेची ISO मानांकनाच्या दिशेने सुरू असलेली ही वाटचाल परिसरातील शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच सकारात्मक पाऊल ठरत आहे.

मोठा वाघोदा येथील उर्दु शाळा येथे इयत्ता पहिली ते सातवी च्या एकूण सात वर्ग सुरू आहेत 210विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यासोबतच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने लोकवर्गणीतून अतिरिक्त एक शिक्षक विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी चे ज्ञान अवगत होणेकामी कंत्राटी पद्धतीने कर्तव्यावर नियुक्त केले आहे इयत्ता आठवी कक्ष वर्ग मागणी केली असून मंजुरी मिळाली असून प्रस्तावित आहे मंजुरी मिळाल्यास इयत्ता आठवी चा वर्ग विद्यार्थ्यांना गावातच उपलब्ध होईल तरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इयत्ता आठवी चा वर्ग मंजुर करुन अनुमती देण्याची मागणी पालक वर्गा सह नागरिकांकडून होत आहे या जिल्हा परिषद उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षक यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून खालील प्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यांमध्ये 

विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी वॉटर कुलर सह 

प्रांगणात पेव्हर ब्लॉक 

10 कम्प्युटर लॅब 

फ्रीजर 

2 वेगळे स्वच्छता गृह 

प्रत्येक रूम मध्ये tv संच राजू दादा सरपंच असताना

इंग्लिश माध्यम प्रमाणे गणवेश

विद्यार्थींना प्रत्येक वर्षी वह्या व पेन 

प्रोजेक्टर 

इलेक्ट्रॉनिक बेल

CC tv कॅमेरे 

उत्कृष्ट व स्वच्छ किचन अशी व्यवस्था केली आहे

No comments