धुपे खुर्द गावचा सुपुत्र डॉ. प्रशांत पाटील यांची वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल BAMS शिक्षण पूर्ण करून आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात पदा...
धुपे खुर्द गावचा सुपुत्र डॉ. प्रशांत पाटील यांची वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल
BAMS शिक्षण पूर्ण करून आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण; माजी सैनिकाच्या मुलाने उंचावला कुटुंबाचा आणि गावाचा मान
चोपडा (प्रतिनिधी) अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
धुपे खुर्द येथील रहिवासी डॉ. प्रशांत मनिषा किशोर पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू केली असून, त्यांच्या या यशामुळे गावासह परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
डॉ. प्रशांत पाटील यांनी २०२० बॅचमधून शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथून बी.ए.एम.एस. (BAMS) हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. ग्रामीण भागातून पुढे येत आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.
त्यांचे वडील श्री. किशोर पाटील हे माजी सैनिक असून, आई गृहिणी आहेत. वडिलांच्या शिस्तीचे आणि आईच्या संस्कारांचे बळ घेऊन डॉ. प्रशांत पाटील यांनी शिक्षणाची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली. सध्या ते चोपडा येथे वास्तव्यास आहेत.
आणि विशेष प्रगतिशील शेतकरी शुभेच्छुक सुभाष सुकलाल कुंभार विचखेडा त्यांच्या या यशामुळे धुपे खुर्द गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या पुढील वैद्यकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


No comments