adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर शहरातील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून चौकशीची मागणी विविध विकासकामांची स्वतंत्र तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी

फैजपूर शहरातील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून चौकशीची मागणी विविध विकासकामांची स्वतंत्र तांत्रिक व प्रशास...

फैजपूर शहरातील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून चौकशीची मागणी

विविध विकासकामांची स्वतंत्र तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी 





इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


फैजपूर : फैजपूर शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या गुणवत्तेबाबत, कामाच्या पद्धतीबाबत तसेच खर्चाबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाल्याचा दावा करत राष्ट्रवादी अजित पवार गटचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा (टायगर) राजेंद्र चौधरी यांनी फैजपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरात नभो गार्डन, जलतरण तलाव, गटारी, रस्ते तसेच इतर नागरी विकासकामे सुरू आहेत. या कामांमध्ये वापरण्यात येणारे साहित्य, कामाचे प्रमाण, मंजूर अंदाजपत्रकानुसार कामाची अंमलबजावणी तसेच बिल व मोजमाप पुस्तिकेतील नोंदी याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे संबंधित सर्व विकासकामांची स्वतंत्र तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. तसेच मंजूर अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर, मोजमाप पुस्तिका, वापरलेले साहित्य, कामाची गुणवत्ता आणि संबंधित देयकांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकशीदरम्यान अनियमितता, निकृष्ट दर्जाचे साहित्य, अंदाजपत्रकापेक्षा वेगळे काम, बोगस नोंदी किंवा शासनाच्या निधीचा गैरवापर आढळल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत गंभीर अनियमितता आढळणाऱ्या कामांबाबत आवश्यकतेनुसार तात्पुरती स्थगिती देऊन संबंधित ठेकेदारास काम पुढे सुरू करण्यास प्रतिबंध करावा, आणि दोष सिद्ध झाल्यास नियमानुसार कारवाई करून झालेल्या नुकसानीची वसुली करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती अर्जदारास देण्यात यावी, अशी विनंती कृष्णा राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जळगाव यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.

निवेदन देतांना राष्ट्रवादी अजित पवार गटचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा(टायगर)चौधरी, उपशहराध्यक्ष नदीम तडवी, उपशहराध्यक्ष वेदांत कुलकर्णी, उपशहराध्यक्ष दानिश भाई, शहर संघटक पवन परदेशी. तसेच पंकज मिस्त्री,भुषण मिस्त्री, दीपक वाघोदे,बंटी सोनवणे आदी उपस्थित होते.

No comments