सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या विचारांनी समृद्ध समाज घडविणे, हीच महात्मा गांधीजींना खरी आदरांजली ....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा खामगाव त...
सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या विचारांनी समृद्ध समाज घडविणे, हीच महात्मा गांधीजींना खरी आदरांजली ....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
खामगाव तालुका प्रतिनिधी पल्लवी पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन
खामगांव - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला सत्य, अहिंसा आणि नैतिकतेची दिशा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी केली जाते. केवळ भारताच्या इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या इतिहासात सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणून महात्मा गांधी यांचे नाव आदराने घेतले जाते.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शांती आणि अंहिसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा उभारुन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याचप्रमाणे भारत देशाचे दुसरे पंतप्रधान स्व.लाल बहादुर शास्त्री यांनी सुध्दा जय जवान-जय किसान चा नारा देवुन विकसनशील भारत देश घडविण्यासाठी महान कार्य केले.या दोन्ही महान नेत्यांचे विचार आणि त्यांची जिवनशैली आजही जगाला प्रेरणा देत आहे. गांधी जयंतीदिनी सत्य,अहिंसा आणि मानवतेच्या विचारांनी समृध्द समाज घडविणे हीच महात्मा गांधीजींना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिप्रादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.शुक्रवार दि. 02 ऑक्टोंबर 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनसमोरील गांधी उद्यानामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान स्व.लाल बहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसच्या खामगाव शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,उपाध्यक्ष नरहरी टिकार गुरुजी, महिला शहर अध्यक्षा शारदाताई शर्मा,डॉ.आर.के.राजपुत,नगरसेवक तहेसीन शाह,शेगाव पंचायत समितीचे माजी सभापती विजय काटोले,संजुभाऊ शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव-शाहु-फुले-आंबेडकर,राष्ट्रपिता महात्मा गांधी,मौलाना अबुल कलाम आझाद या थोर महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुका होणार आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकांच्या सुख,दुःखामध्ये सहभागी होवुन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकतेने कार्य करावे आणि घरा-घरात, राष्ट्रवादी मना-मनात हा विचार जनतेमध्ये रुजवावा असे त्यांनी सांगितले.
राणा दिलीपकुमार सानंदा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार तसेच लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही जयंतीनिमित्त थोर महापुरुषांच्या स्मृतींना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय, अमर रहे-अमर रहे महात्मा गांधी अमर रहे, लाल बहादुर शास्त्री की जय, जय जवान-जय किसान, हम सब एक है, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला शिवाजीराव पांढरे,सत्तु शर्मा,गजानन जाधव, पुरुषोत्तम शेजोळे,अन्सार भाई, प्रमोद महाजन,निलेश तासतोडे,आकुब भाई,कडुबा पांढरे,अवधुत टिकार,एजाज देशमुख,जुबेर शाह,दुर्गासिंग ठाकुर,सैय्यद फारुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments