adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा समाजकार्य महाविद्यालयात सेवा संकल्प अभियान: रोजगार, स्पर्धा परीक्षा व सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चोपडा समाजकार्य महाविद्यालयात सेवा संकल्प अभियान: रोजगार, स्पर्धा परीक्षा व सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चोपडा प्रतिनिधी  (स...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयात सेवा संकल्प अभियान: रोजगार, स्पर्धा परीक्षा व सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन




चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा : भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षा आणि सायबर सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व. डॉ. सुशिलाबेन शहा (जीजी) यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. संस्थेच्या उपाध्यक्षा छायाबेन गुजराती अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराती, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच चोपडा तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांचे विद्यार्थी आणि समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 रोजगार व कौशल्य विकासाच्या संधींची माहिती


पहिल्या सत्रात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथील श्री. सुभाष कदम यांनी रोजगाराच्या विविध संधी, कौशल्य विकास आणि शासकीय योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून उपलब्ध रोजगारविषयक सेवा आणि कौशल्य विकासाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


 ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षांना सामोरे जा


दुसऱ्या सत्रात जिल्हा परिषद शाळा, वेले, ता. चोपडा येथील मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक तसेच वर्ग एक व वर्ग दोन अधिकारी पदांच्या परीक्षांचे स्वरूप आणि तयारी याबाबत त्यांनी अनुभवाधारित माहिती दिली. विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.


 सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


तिसऱ्या सत्रात चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पवन देसले यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. मोबाईल हॅकिंग, वैयक्तिक माहितीची चोरी, सोशल मीडियावरील माहितीचा गैरवापर आणि ऑनलाइन आर्थिक फसवणूक यांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले. बँकेचा ओटीपी, पिन आणि गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे तसेच सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सेवा संकल्प अभियानाचे समन्वयक प्रा. डॉ. मारोती गायकवाड आणि प्रा. डॉ. संबोधी देशपांडे यांनी केले. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले. रोजगाराभिमुख मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

No comments