अनेर मध्यम प्रकल्पाच्या सिंचन हंगाम पूर्व आढावा व कालवा सल्लागार समितीची सभा काल्पनिक फाईल चित्र विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी) (संपादक : हे...
अनेर मध्यम प्रकल्पाच्या सिंचन हंगाम पूर्व आढावा व कालवा सल्लागार समितीची सभा
काल्पनिक फाईल चित्र
विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
गणपूर (ता चोपडा)ता 31: येथून जवळच असलेल्या अनेर व करवंद मध्यम प्रकल्पाच्या कालवा व पाणी वाटप सल्लागार समितीची सभा दोन नोव्हेंबर रोजी शिरपूर येथील उपविभागीय कार्यालयात सकाळी अकरा वाजता घेण्यात येणार आहे.जिल्हावाईज पालक मंत्र्यांची बैठक होऊन त्यात राखीव साठा व सिंचन वापर यावर निर्णय होतो त्यानंतर ही बैठक घेण्यात येथे. या बैठकीत धरण पात्रातील एकूण पाणीसाठा, उपयुक्त पाणीसाठा याचा आढावा घेण्यात येणार असून निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र यातील तफावतीचा आढावा घेण्यात येणार आहे. यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय पाणीपट्टी वसुली व सल्लागार समित्यांना द्यावयाचा परतावा यावरही चर्चा करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी पी बी पाटील यांनी सांगितले.

No comments