adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वामी विवेकानंद विद्यालयातील दिवाळी चिमुकल्यांच्या उत्सवाने जिंकले मन प्रमुख अतिथी प्रा. आशा बिरारी पाटील यांचे निरीक्षण; चिमुकल्यांचा उत्साह, शाळेची स्वच्छता आणि शिक्षकवृंदाच्या सहकार्याचे विशेष कौतुक

स्वामी विवेकानंद विद्यालयातील दिवाळी चिमुकल्यांच्या उत्सवाने जिंकले मन  प्रमुख अतिथी प्रा. आशा बिरारी पाटील यांचे निरीक्षण; चिमुकल्यांचा उ...

स्वामी विवेकानंद विद्यालयातील दिवाळी चिमुकल्यांच्या उत्सवाने जिंकले मन 

प्रमुख अतिथी प्रा. आशा बिरारी पाटील यांचे निरीक्षण; चिमुकल्यांचा उत्साह, शाळेची स्वच्छता आणि शिक्षकवृंदाच्या सहकार्याचे विशेष कौतुक



इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


नाशिकच्या मोरवाडी, नवीन सिडको परिसरातील स्वामी विवेकानंद सोसायटीच्या स्वामी विवेकानंद विद्यालयात शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दिवाळी उत्सवाचे सुंदर आणि नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी इनोव्हेटिव्ह मेकर्स अकॅडमी फाउंडेशन, नाशिकच्या संस्थापिका-अध्यक्षा प्रा. आशा बिरारी पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या भेटीदरम्यान शाळेतील वातावरण, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिक्षकवृंदाचे कार्य जवळून अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली.

दिवाळीच्या पाचही दिवसांचे महत्त्व अधोरेखित करणारे देखणे देखावे आणि आकर्षक सजावट हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. प्रत्येक सजावटीमागे घेतलेली मेहनत, कल्पकता आणि बारकाईने केलेले नियोजन पाहून शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांची जाणीव झाली. भारतीय सण-परंपरांची ओळख विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने करून देण्याचा हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद होता.


चिमुकल्यांचा निरागस उत्साह मनाला भावला


शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि पाहुण्यांचे प्रेमाने केलेले स्वागत यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते. चिमुकल्यांचा उत्साह अनुभवताना त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळेत आनंददायी वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व प्रकर्षाने जाणवले.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शाळेतील स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि विद्यार्थ्यांमध्ये दिसणारी शिस्त. मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दिसणारे शिस्तबद्ध वर्तन, संस्कारक्षम वातावरण आणि उपक्रमांमधील सहभाग निश्चितच कौतुकास्पद होता. शिक्षणासोबतच स्वच्छता, शिस्त, सहकार्य आणि सांस्कृतिक मूल्ये रुजविण्याचे काम येथे प्रभावीपणे होत असल्याचे जाणवले.


शिक्षकवृंदाचे सहकार्य आणि मुख्याध्यापिकांचे नियोजन उल्लेखनीय


कार्यक्रमाच्या आयोजनात शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य विशेष जाणवले. सर्वांनी विनम्रतेने आणि आपुलकीने स्वागत केले. कार्यक्रमातील शिस्तबद्ध व्यवस्था आणि पाहुण्यांशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत प्रभावी होती.

शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बोरसे यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती अत्यंत सुंदर, सुसंगत आणि आत्मीयतेने दिली. त्यांची विनम्रता, संवादकौशल्य आणि शाळेच्या कार्याविषयीची जाण भावणारी होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्रयत्न असल्याचे स्पष्टपणे जाणवले.


शाळेच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा


प्रमुख अतिथी म्हणून शाळेला भेट देताना मिळालेला अनुभव आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला. शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारी जागा नसून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वच्छता, संस्कार, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास विकसित करणारे केंद्र असते. स्वामी विवेकानंद विद्यालयातील दिवाळी उत्सवातून या मूल्यांचे सुंदर दर्शन घडले.

स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बोरसे, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांचे या सुंदर आयोजनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! शाळेची शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचाल अशीच प्रगतिशील राहो, ही सदिच्छा.

No comments