नंदुरबारच्या नवोदय विद्यालयातील निहारिका कोळीच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी सम...
नंदुरबारच्या नवोदय विद्यालयातील निहारिका कोळीच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करा
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी समाजाची जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बुलडाणा : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या निहारिका कोळी या निरागस विद्यार्थिनीचा वसतिगृहात झालेला संशयास्पद मृत्यू गंभीर असून, या प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून, निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडेही देण्यात आल्या आहेत. निहारिका कोळीच्या मृत्यूची तात्काळ चौकशी करून मृत्यूमागील सत्य समोर आणावे तसेच तपासात दोषी आढळणाऱ्या संबंधित कर्मचारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निहारिका कोळीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करून सखोल तपास करण्यात यावा. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका समाजाच्या वतीने मांडण्यात आली.
तसेच शिक्षण संस्थांमध्ये आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी, जातीयवादाला आळा घालावा आणि वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“निहारिका कोळीच्या मृत्यूला न्याय मिळालाच पाहिजे. दोषी कोणताही असो, निष्पक्ष चौकशीतून सत्य समोर आले पाहिजे,” अशी ठाम भूमिका आदिवासी कोळी समाजाच्या वतीने मांडण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी गणेशभाऊ इंगळे, भगवान पवार, गंगाधर तायडे, कृष्णा दोडे, अरविंद भोलवणकर, संदीप जाधव, विलास जाधव, प्रवीण जाधव, वामन जाधव, प्रशांत आडे, सुरज झाल्टे, सुरेश झाल्टे, समाधान सोनोने, राजेंद्र झाल्टे, डॉ. सुभाष तायडे, डॉ. राजेंद्र जाधव, नंदकिशोर जाधव, दीपक इंगळे, विजय इंगळे, श्रीराम खवले, अमोल तायडे, सारंगधर सुरडकर, विष्णू सुरडकर, गजानन धाडे, ज्ञानदेव भोलवणकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

No comments