adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता सप्ताहाचे आयोजन

  जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता सप्ताहाचे आयोजन    मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश...

 जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता सप्ताहाचे आयोजन 



 मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड 

(संपादक हेमकांत गायकवाड )


जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये २ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय परीसरात स्वच्छता करून शाळेचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी व उपप्राचार्या व्ही. के. शिर्के यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

तसेच ​महान व्यक्तींच्या विचारांचा विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार व्हावा आणि त्यांच्यातील वक्तृत्व गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विद्यालयात भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 'इयत्ता ५ वी ते ७ वी' आणि 'इयत्ता ८ वी ते १० वी' अशा दोन गटांत पार पडली.

​स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला. केवळ प्रतिमापूजन करणे म्हणजे जयंती साजरी करणे नव्हे, तर महापुरुषांचे विचार स्वतःच्या आचरणात आणणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, तसेच शालेय परीसर,सार्वजनिक ठिकाण, मंदीर परिसर,नदी किनारा आपण स्वच्छ ठेवून आदर्श निर्माण करावा असा मोलाचा संदेश दिला. तसेच महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या बद्दल माहिती विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांनी सांगितली.

​या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन उपशिक्षिका ए. पी. पाटील आणि एस. एस. कोलते यांनी केले. तर स्पर्धेचे परीक्षण उपशिक्षिका आर. व्ही. महाजन , एल. व्ही. पाटील व पी. एस. बढे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता उत्साही वातावरणात झाली.याप्रसंगी पर्यवेक्षक के. आर.कवळे , व्ही. डी. बऱ्हाटे आणि एस. एम.वाढे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments