adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते आनंद मेगा मार्टचे उद्घाटन ; हास्य जत्रा फेम शाम राजपूत यांची उपस्थिती

चोपड्यात आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते आनंद मेगा मार्टचे उद्घाटन ; हास्य जत्रा फेम शाम राजपूत यांची उपस्थिती चोपडा प्रतिनिधी  (संपादक : ह...

चोपड्यात आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते आनंद मेगा मार्टचे उद्घाटन ; हास्य जत्रा फेम शाम राजपूत यांची उपस्थिती



चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा शहरातील नामांकित आनंद ग्रुप्सच्या आनंद मेगा मार्ट शाखा क्रमांक २ मेन रोड या भव्य दालनाचा शुभारंभ दि.१९ वार सोमवार रोजी होत आहे.आनंद मेगा मार्टचे उद्घाटन तालुक्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते शाम सुंदर राजपूत यांची उपस्थिती तर जळगाव येथील उद्योगपती पारस टाटिया,सुरेश टाटिया,चोपडा येथील उद्योगपती प्रवीण टाटिया यांची उपस्थिती लाभणार आहे.


आनंद ग्रुप्स यांच्या आनंद सुपर शॉपी या पहिल्या शाखेला तालुक्यातील ग्राहकांनी पसंती दिल्यानंतर 

सहा वर्षांच्या विश्वासानंतर आज आनंद मेगा मार्ट या भव्य दालनाचा शुभारंभ होत आहे.यात प्रत्येक 

परिवारासाठी आणि परिवारातील प्रत्येकासाठी गृहपोयोगी साहित्य उपलब्ध असणार आहे. सामानाचा उत्तम दर्जा आणि माफक भाव यांचा ताळमेळ इथं अनुभवायला मिळणार आहे.तर विनामूल्य घरपोच सेवा देखील मिळणार आहे.सह परिवार खरेदीचा आनंद या आनंद मेगा मार्ट मध्ये घेता येईल असा विश्वास मेगा मार्टचे संचालक डॉ.निर्मल टाटिया,मनीष टाटिया,चेतन टाटिया आणि आनंद परिवाराच्या वतीने व्यक्त केला असून 

मेगा मार्टला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 विनामूल्य घरपोच सेवा घेण्यासाठी 7090078900 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments