adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

*जळगाव जिल्हा बैंकेच्या निवडणुकीत समविचारी संघटना,पक्ष एकत्र*

 *जळगाव जिल्हा बैंकेच्या निवडणुकीत समविचारी संघटना,पक्ष एकत्र* जळगाव प्रतिनिधी: अशोक कोळी  (संपादक :- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मध्यवर्त...

 *जळगाव जिल्हा बैंकेच्या निवडणुकीत समविचारी संघटना,पक्ष एकत्र*



जळगाव प्रतिनिधी: अशोक कोळी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक (JDCC Bank Jalgaon Election)  निवडणूक नोव्हेंबर मध्ये होत असून त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र शेतकरी संघटना समविचारी पक्ष यांनी एकत्र येत बैठक घेतली यात २४ संघटना, पक्ष एकत्र येत शेतकरी एकता पॅनल ची स्थापना केली

    जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांची बँक असून त्या बँकेमध्ये शंभर टक्के घराणेशाही वरती काम चालू आहे शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतीही निर्णय बँकेच्या माध्यमातून घेतलेले दिसून येत नाही फक्त संचालक मंडळ जे ठरवतील त्यांच्या हिताचे त्याच पद्धतीने निर्णय बँकेमध्ये निर्णय घेतले जात आहे एवढेच नाही तर बँकेच्या वेळोवेळी होणाऱ्या बैठकांमध्ये संचालक गैरहजर असतात जर का संचालकांना वेळच नाही तर त्यांनी बँकेमध्ये संचालक म्हणून का जावे व ते होत असताना परत आपल्या कुटुंबातील सदस्यांना बँकेमध्ये संचालक का करावे हा प्रश्नचिन्ह जळगाव जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहे जिल्हा बँकेतील  घराणेशाही थांबविण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे, शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप पाटील जागरूक जनमंच चे अध्यक्ष शिवराम पाटील, सैनिक समाज पक्ष यांचे ईश्वर मोरे ,ओबीसी महासंघाचे अध्यक्ष नितीन चौधरी, छावा क्रांतिवीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर शिंदे, राष्ट्रीय जनमंच पक्षाचे महा. प्रदेश सचिव संदीप लांडगे , राष्ट्रीय जन मंच पक्षाचे जळगाव महानगर अध्यक्ष संतोष बाविस्कर ( राधे बाबा ), सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील एकूण 24 संघटना एकत्र येत जिल्हा बँकेला उद्या राणीच्या विरोधात शेतकरी एकता पॅनल ची स्थापना करून पूर्ण 21 जागांवर उमेदवार उभे करत असताना मोठे आव्हान महायुती,महाविकास आघाडी यांना आव्हान उभे केले आहे.

  जळगाव जिल्हा बँक बिनविरोध होणार नाही हे निश्चित झाले आहे

  श्रीदेवी यांनी सांगितले की जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी मतदार व विविध पक्षाचे संभाव्य उमेदवार कोण असतील त्याबाबत सांगितले. 

   या बैठकीला जळगाव जिल्ह्यातील विरोधात असणाऱ्या सर्व राजकीय पक्ष, समविचारी संघटना उपस्थित होते व बिनविरोध होणारी निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

    तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व सभासदांना व जळगाव जिल्ह्या बँकेच्या मतदारांनी सुचित करण्यात येते की ज्यांना या लोकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी व शेतकरी एकता पॅनल मध्ये सहभागी होण्यासाठी शिवराम पाटील यांनी केले आहे.

No comments