किनगाव खुर्द गावी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते ग्रामपंचायतच्या इमारतीचे भूमिपूजनव बौद्ध विहाराचे लोकार्पण [भरत कोळी - यावल] [सं...
किनगाव खुर्द गावी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते ग्रामपंचायतच्या इमारतीचे भूमिपूजनव बौद्ध विहाराचे लोकार्पण
[भरत कोळी - यावल]
[संपादक - हेमकांत गायकवाड]
किनगाव खुर्द ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन चोपडा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच गावात उभारण्यात आलेल्या बौद्ध विहाराचे आणि गावात ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण देखील त्यांनी केले याप्रसंगी गावात आलेल्या आमदारांनी जिल्हा परिषद उर्दू शाळेला भेट देऊन तेथे करण्यात आलेल्या रंगरंगोटीच्या आणि विविध कामांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्याच्या अडीअडचणी जाणून घेतल्या . आणि शैक्षणिक प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला किनगाव खुर्द तालुका यावल या गावात पुढाकाराने ग्रामपंचायतीच्या नवीन इमारती करिता 25 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तेव्हा या नवीन इमारतीचे काम आता लवकर सुरू होणार असून या कामाचे भूमिपूजन चोपडा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किनगाव खुर्दच्या सरपंच रूपाली बबलू कोळी उपसरपंच रियाज सुजात तडवी ग्रामपंचायत सदस्य साजिद शहा राहुल साळुंखे वैशाली संजय पाटील कल्पना रतन वानखेडे ताहेर इस्माईल तडवी यांची उपस्थिती होती दरम्यान या कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून 20 लाख रुपयांत उभारण्यात आलेल्या बौद्ध विहाराचे देखील लोकार्पण करण्यात आले गावातील नव्याने उभारलेल्या या बौद्ध विहाराच्या लोकार्पण प्रसंगी समाज बांधवांची मोठ्या संकेत उपस्थिती होती त्याचप्रमाणे किनगाव गावात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विविध चौक मोक्याचे ठिकाण संवेदनशील परिसरात ग्रामपंचायतच्या माध्यमातून तब्बल 12 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. तेव्हा या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या लोकांना देखील आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बाळू पाटील शांताराम कोळी रामराव पाटील संजय महाजन जगदीश कोळी संजय कोळी निळकंठ पाटील सुरेश तायडे रवींद्र सपकाळे नवल कोळी अशोक कोळी तिनाकोडी मिलिंद उर्फ डॉन कोडी ग्रामसेविका सोनाली सोनवणे संतोष उर्फ छोटू तायडे प्रकाश वाणीशबाना युनू सय्यद संतोष तायडे प्रकाश वाणी उमेद महिला बचत गटाच्या सर्व महिला वसंत रविदास महाराज महिला बहुउदेशीय बचत गटाच्या संपूर्ण महिला उपस्थित होत्या या संपूर्ण कार्यक्रमानंतर आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी किनगाव गावातील जिल्हा परिषद उर्दू शाळेला देखील भेट दिली तेथील देखभाल दुरुस्तीचे काम झाले होते ते व्यवस्थित झाले आहे किंवा नाही याची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांशी इतकच करताना त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत शैक्षणिक आणि अडचणी यांना सोडवण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य देऊ असे आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले

No comments