adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शालेय क्रीडा स्पर्धेत चहार्डीच्या भाऊसाहेब पाटील विद्यालयाच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी २७ खेळाडू जिल्हास्तरासाठी पात्र

  शालेय क्रीडा स्पर्धेत चहार्डीच्या भाऊसाहेब पाटील विद्यालयाच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी  २७ खेळाडू जिल्हास्तरासाठी पात्र १४ वर्षाआतील मुली...

 शालेय क्रीडा स्पर्धेत चहार्डीच्या भाऊसाहेब पाटील विद्यालयाच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

 २७ खेळाडू जिल्हास्तरासाठी पात्र



१४ वर्षाआतील मुलींच्या विजयी संघासोबत तालुका क्रीडा संयोजक आर.पी.आल्हाट व क्रीडा शिक्षक.


चहार्डी प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 चहार्डी ता. चोपडा_ महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे ,जळगाव जिल्हा क्रीडा परिषद व पंचायत समिती चोपडा यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत चहार्डी ता. चोपडा येथील भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील विद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत धव घवीत यश संपादन केले. २७ खेळाडू जिल्हा स्तरासाठी पात्र ठरले .सांघिक क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात १४ वर्षे आतील मुलींचा व्हॉलीबॉल संघ तालुकास्तरावर विजेचा ठरला. संघात काजल पाटील, मानसी पाटील , कोमल पाटील ,भाग्यश्री पाटील, सानवी पाटील, सलोनी पाटील ,लावण्या पाटील, भुवनेश्वरी पाटील, चैतन्या पाटील, हिमांशी पाटील . जानवी जैन व भाग्यश्री कोळी यांच्या समावेश होता. याच वयोगटात १४ वर्षातील मुलांचा संघांला तृतीय स्थानावर समाधान मानवी लागले. १७ वर्षा आतील मुलींचा व्हॉलीबॉल संघ उपविजेता ठरला. यात अनल पाटील, मोहिनी चौधरी, कार्तिकी पाटील, ग्रीष्मा शहा ,हर्षदा पाटील ,प्रणाली पाटील, अनुश्री चौधरी, मानसी पाटील, पूर्वा कंखरे, मोहिनी पाटील, बुशराजहा खाटीक, सविता बारेला यांचा समावेश होता. मैदानी स्पर्धेत १५ खेळाडू जिल्हास्तरावर पात्र ठरले . यात सतरा वर्षा आतील वयोगटात नकुल कोळी_१००मीटर धावणे- प्रथम ,लांबउडी _द्वितीय. मोहिनी चौधरी -१०० मीटर धावणे _ प्रथम. चार बाय शंभर मीटर रिले क्रीडा प्रकारात मुला मुलींचे दोन्ही संघ विजेते ठरले असून यात नकुल कोळी ,पियुष सोनवणे, लोकेंद्र महाजन ,अनुज पाटील ,साहिल बारेला, मोहिनी चौधरी , भाविका पाटील ,बुशराजहा खाटीक, राजश्री अहिरे यांच्या समावेश आहे. तिहेरी उडी व १०० मीटर हर्डल्स -अनुज पाटील-तृतीय. १९ वर्षाआतील वयोगटात भावेश शिरसाट -गोळा फेक- द्वितीय. तेजस पाटील - लांबडी - द्वितीय .१०० मीटर धावणे _ सुषमा कोळी -तृतीय .१४ वर्षा आतील मुलीव १९ वर्षातील वयोगटात मुलांचा चार बाय शंभर मीटर रिले संघ उपविजेते ठरले असून यात निपुण पाटील आदर्श राजपूत ,तेजस पाटील , तेजस सोनवणे , जानवी कोळी ,योगिता पाटील ,हिमांशी सोनवणे, तेजल कोळी ,कोमल कोळी यांचा समावेश होता. वरील सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश पाटील, उपाध्यक्ष डॉ.पराग पाटील . सचिव प्रकाश पाटील ,शालेय समितीचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सहसचिव जे.डी. चौधरी, मुख्याध्यापक शरद जगताप उप मुख्याध्यापक पी. बी. पाटील पर्यवेक्षक जे.डी.सोनवणे व शिक्षकांनी अभिनंदन केले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक जितेंद्र महाजन , स्वाती चौधरी , विनोद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


No comments