adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल पोलिसांची धडक कारवाई! देशी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त.किनगाव परिसरात पोलिसांची कारवाई; २५ वर्षीय तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वे गुन्हा दाखल

यावल पोलिसांची धडक कारवाई! देशी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त.किनगाव परिसरात पोलिसांची कारवाई; २५ वर्षीय तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र...

यावल पोलिसांची धडक कारवाई! देशी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त.किनगाव परिसरात पोलिसांची कारवाई; २५ वर्षीय तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वे गुन्हा दाखल



यावल प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


यावल आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाणे हद्दीत कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा घडू नये,यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी व गस्तीसह संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याच अनुषंगाने यावल पोलिसांनी किनगाव परिसरात केलेल्या कारवाईत एका २५ वर्षीय तरुणाकडून देशी बनावटीचा लोखंडी कट्टा (पिस्तूल) व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे यावल येथील नियुक्त पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व त्यांचे पथक यावल पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रकटीकरणाचे काम करीत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक गोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार किनगाव येथील पवन सोनवणे हा देशी कट्टा जवळ बाळगून असल्याची माहिती मिळाली.

ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गोरे यांनी याबाबत पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांना किनगाव परिसरात योग्य ठिकाणी सापळा लावून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हॉटेल परिसरात सापळा; संशयित ताब्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यानंतर दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता यावल ते चोपडा हायवेवरील किनगाव गावाजवळील हॉटेल श्री. समोर संशयित पवन कैलास सोनवणे (वय २५, रा. किनगाव बुद्रुक, ता. यावल, जि. जळगाव) यास ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये त्याच्या जवळ एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) तसेच दोन जिवंत काडतुसे मिळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ धुळे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५६/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५(१-ब)(अ) अंतर्गत दि. ३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८.२० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस कर्मचारी सचिन धुळे, मयूर निकम, तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मेहबूब सय्यद आणि पोलीस कॉन्स्टेबल हितेश बागुल यांनी केले 

या प्रकरणातील आरोपी पवन कैलास सोनवणे यास पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, यावल पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments