adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तावसे बु!! येथे रंगणार त्रिदिवसीय कीर्तन महोत्सव; नामवंत कीर्तनकारांची लाभणार सेवा

तावसे बु!! येथे रंगणार त्रिदिवसीय कीर्तन महोत्सव; नामवंत कीर्तनकारांची लाभणार सेवा चोपडा तालुका प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) वारकरी...

तावसे बु!! येथे रंगणार त्रिदिवसीय कीर्तन महोत्सव; नामवंत कीर्तनकारांची लाभणार सेवा


चोपडा तालुका प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


वारकरी संप्रदायाची परंपरा जपत भक्ती, अध्यात्म आणि प्रबोधनाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कै. तात्या व कै. ताई यांच्या पुण्यस्मरणार्थ यंदाही तीन दिवसीय ‘त्रिदिवसीय कीर्तन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे पंचक्रोशीतील भाविकांना नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनसेवेचा लाभ मिळणार असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

     शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२६ ते रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात विविध मान्यवर ह.भ.प. महाराजांची कीर्तनसेवा लाभणार आहे. विशेष म्हणजे रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सकाळी काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

*पहिल्या दिवशी लक्ष्मण महाराज कोकाटे यांची कीर्तनसेवा*

   महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी प.पू. ह.भ.प. श्री लक्ष्मण महाराज कोकाटे (कन्हेरी संस्थान, बारामती) यांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ८ ते १० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

*दुसऱ्या दिवशी ह.भ.प.भरत महाराज पाटील यांचे कीर्तन*

  शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री भरत महाराज पाटील (झेंडुजी महाराज बेली संस्थान) यांची कीर्तनसेवा होणार आहे. सायंकाळी ८ ते १० या वेळेत भाविकांना त्यांच्या कीर्तनाचा लाभ घेता येणार आहे.

*कोजागिरी पौर्णिमेला पांडुरंग महाराज घुले यांचे काल्याचे कीर्तन*

  महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प.पू. ह.भ.प. श्री पांडुरंग महाराज घुले (अध्यक्ष, श्री संत तुकाराम महाराज वा. संशोधन मंडळ, श्री क्षेत्र देहू) यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

*नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती; भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन*

 या धार्मिक सोहळ्यानिमित्त श्रद्धेय आळंदीकर ह.भ.प. विश्वनाथ महाराज कोल्हे, ह.भ.प. आबा महाराज गोडसे, ह.भ.प. गोविंद महाराज चौधरी, ह.भ.प. भरत महाराज चौधरी, ह.भ.प. अंकुश महाराज पाटील, ह.भ.प. समाधान महाराज रिंगणगावकर, ह.भ.प. विकास महाराज मोरडककर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज घाडवेलकर, ह.भ.प. रामचंद्र महाराज सारंग, ह.भ.प. जनार्दन महाराज दहिवदकर, ह.भ.प. रविंद्र महाराज कुमठकर, ह.भ.प. वैभव महाराज गलधर यांच्यासह खान्देश परिसरातील अनेक महाराज मंडळी, तावसे बु !! ग्रामस्थ, भजनी मंडळे तसेच कुरवेल , खाचणे, निमगव्हाण आणि गरताड येथील भाविक व भजनी मंडळे उपस्थित राहणार आहेत.

  या महोत्सवाच्या माध्यमातून संतविचार, नामस्मरण, भक्ती आणि आध्यात्मिक संस्कारांची परंपरा अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. कीर्तनातून समाजप्रबोधनाचा विचार जनमानसात रुजविण्याबरोबरच नव्या पिढीला वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेची ओळख करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

   या महोत्सवात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनसेवेचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नरहरी महाराज चौधरी यांनी केले आहे.

  आयोजक व निमंत्रक : अशोक अमृत चौधरी, गं. भा. आशाताई रतिलाल पाटील आणि धनराज अमृत चौधरी.

No comments