adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव आणि पानिपत दरम्यान विशेष गाडी चालवणार

  जळगाव आणि पानिपत दरम्यान विशेष गाडी चालवणार लियाकत शाह जळगांव (संपादक : हेमकांत गायकवाड) प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने जळग...

 जळगाव आणि पानिपत दरम्यान विशेष गाडी चालवणार



लियाकत शाह जळगांव

(संपादक : हेमकांत गायकवाड)


प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने जळगाव आणि पानिपत दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे:

गाडी क्रमांक ०१०६७ विशेष, २१ ऑक्टोबर २०२६ (बुधवार) रोजी जळगावहून १८:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६:०० वाजता पानिपतला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०६८ विशेष, २२ ऑक्टोबर २०२६ (गुरुवार) रोजी पानिपतहून १९:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६:४० वाजता जळगावला पोहोचेल.

थांबे : भुसावळ, खांडवा, भोपाळ, बिना, आग्रा कॅन्ट, पलवल, नवी दिल्ली आणि पानिपत.

डब्यांची रचना: या विशेष गाडीमध्ये १० स्लीपर क्लास, ७ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड क्लास सीटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन (दिव्यांगांसाठी सोयीस्कर) डबे असतील.

प्रवासी तिकीट बुकिंगसाठी 'रेलवन' ॲपचाही वापर करू शकतात. या विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळापत्रकांविषयी सविस्तर माहितीसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

No comments